शहापुरातील तरुणाची दुग्ध व्यवसायातून भरारी

दुग्धव्यवसायासाठी ऑस्ट्रेलियातून आणलेल्या गाई.
दुग्धव्यवसायासाठी ऑस्ट्रेलियातून आणलेल्या गाई.
Updated on

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गापासून चार किमी अंतरावरील भातसा कालव्याजवळील माळरानात ऑस्ट्रेलियन गाई आणून ‘धवल क्रांती’ करण्याचे स्वप्न कुणी पाहू शकेल का? पण शहापुरातील एका तरुणाने हे स्वप्न बघितले आणि प्रत्यक्षात उतरविले. प्रदीप आळशी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

१९८८ पासून रेती, खडी व डबर पुरवठा करण्याचा व्यवसाय चांगला सुरू होता. पण २०१५ मध्ये या व्यवसायात कडक नियमांमुळे तो करणे जिकिरीचे झाले. हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय प्रदीप यांनी घेतला. चेरपोलीचा मित्र दुधाचा व्यवसाय छोट्या प्रमाणात करत होता. त्यातील बारकावे प्रदीप यांनी समजून घेतले.

प्रदीप यांनी गुजरातमधील मेहसाणा येथून सहा म्हशी आणल्या आणि शहापुरात तसेच अमूल डेअरीला नियमित दूध पुरवठा करू लागले. त्यांनी म्हशींची संख्या १०, तर जोडीला ७५ ऑस्ट्रेलियन गाई आणल्या. या गाई दोन वर्षाच्या असतानाच २० लिटर दूध देऊ लागतात आणि त्यांचे आयुष्य २० ते २२ वर्ष असते; तर म्हशी १० ते १५ लिटर दूध रोज देतात. त्यांचे आयुष्य १८ ते २० वर्ष असते. यामुळे दररोज ६०० लिटर दूध भिवंडी शहरात पुरवठा करणे सुरू केले. नोकरीतील दररोजच्या कटकटीला वैतागलेल्या परंतु मेहनत करून व्यवसायात इच्छुक असलेल्या तरुणांसमोर हा व्यवसाय म्हणजे एकप्रकारचा आदर्शच ठरला आहे. 


उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियन गायींना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून शेडमध्ये पंखे लावण्यात आले आहेत. गायींना दररोज धुतले जाते. त्यांचे शेण तत्काळ हटवून एका ठिकाणी त्याचा साठा केला जात होता. आठवड्याला दोन ट्रक शेण नाशिकचे बागाइतदार घेऊन जातात. भविष्यात हा व्यवसाय मोठा करण्याचा मानस आहे. 
- प्रदीप आळशी, दूग्ध व्यवसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.