Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तरुणाने केला पेटवून घेण्याचा प्रयत्न; वर्षा बंगल्याच्या परिसरात नेमकं काय घडलं?

Varsha Bunglow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर एका तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Esakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर एका तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाबाहेर काही आरोग्य विभागाचे विद्यार्थ्यी आंदोलन करत होते. मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी अशी या आंदोलकांची मागणी होती.

मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्यामुळे यातील एका संतापलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी 30 ते 40 तरुणांना ताब्यात घेतले आहे.

"आरोग्य विभाग पदभरतीचा निकाल जाहीर होऊन आज जवळपास आठ महिने होत आले आहेत. तरीसुद्धा आतापर्यंत आरोग्य विभागाने आम्हाला नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. सर्व मंत्र्यांसह आरोग्य विभागाला याची कल्पना असुनही आमची फरफट चालू आहे. नियुक्ती मिळावी यासाठी सर्व निवड झालेले उमेदवार याबाबत पाठपुरावा करुनही कोणतीही हालचाल होत नाही," असे वर्षाबाहेर घडलेल्या घटनेनंतर एका उमेदवाराने सांगितले.

दरम्यान येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहीता लागण्याची शक्यता आहे. जर आचारसंहीता लागली तर नियुक्ती आदेश मिळणार नाहीत अशी भीती उमेदवारांना वाटत आहे.

Eknath Shinde
Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा; नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो!

दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होत आहे. सध्या राज्यात गेल्या एका वर्षांपासून मनोज जरांगे यांचे ओबीसीतून मराठा समाजासाठी आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन होत आहे. तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली ओबीसी नेते आंदोलन करत आहे.

या आरक्षणाबाबतच्या विविध समाजांच्या रोषातून सावरत नाही तोपर्यंत विविध सरकारी कर्मचारी, विविध विभागातील कर्मचारी, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

Eknath Shinde
Govinda Misfire: अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी, मिसफायरवर शंका... नेमके काय घडले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.