मुंबई: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (yusuf lakdawala) ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व बॉलीवूड फायनान्सर युसुफ लकडावाला यांची सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली. खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची 50 कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी (land grab case) ही चौकशी करण्यात आली. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली. (yusuf lakdawala arrest by ed in land grab case)
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व बॉलीवूड फायनान्सर युसुफ लकडावाला यांची सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) कालही चौकशी केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी ईडीने आता त्यांचा जबाब नोंदवला. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. बनावट कागदपांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर(50 कोटी किमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला(74) गुजरातमधून आर्थिक गुन्हे शाखेने 12 एप्रिल 2019 ला अहमदाबाद येथून अटक केली होती.
लकडावाला विमानाद्वारे लंडनला जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. आरोपींनी मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील बडगुजर यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा लकडावालासह मोहन नायर नावाच्या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपींनी ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन बनावट केल्याचा आरोप आहे. तसेच न झालेला व्यवहार या कागदपत्रांच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार उघड होऊ नये यासाठी मुंबईतील नोंद करण्यात आलेले नोंदणी क्रमांक वापरले. तसेच मूळ कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी गुप्ताच्या लोणावळा येथील सदनिकेत या व्यवहाराबाबत झालेल्या बैठकीत कट रचण्यात आला होता. आरोपींनी नवाबाच्या मालकीची साडेचार एकर जमीन बळकावण्यासाठी 1949 मधील बनावट करारपत्र बनवले. त्याची मुंबई निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. तसेच मावळ दुय्यम निबंधक कार्यालयातील खरी कागदपत्रे गहाळ करण्याचा प्रयत्नही झाला होता.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला, शौकत घौरी, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता यांना अटक झाली होती. 50 कोटी रुपयांची जमीन बळकावण्यासाठी साडे अकरा कोटीं रुपये खर्च करण्यात आले होते. साडेअकरा कोटींतील सर्वांत मोठा वाटा म्हणजेच पाच कोटी ढेकळेच्या वाट्याला आले होते. बनावट डीडी आणि करारपत्र तयार करून जमीन कशी बळकावता येईल, बनावट कागदपत्रे खरी कशी भासवता येतील, याबाबत ढेकळेने युसूफला यंत्रणेतील पळवाटा सांगितल्या होत्या. गुप्ताला एक कोटी; तर घोरीला दीड कोटी रुपये देण्यात आले. आरोपी मोहन नायर याला युसूफकडून या कामासाठी चार कोटी मिळाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.