वाढत्या महागाई विरोधात युवा सेनेचे थाळी बजाओ आंदोलन

डोंबिवलीत युवा सेनेने केला मोदी सरकारचा निषेध
थाळी बजाओ खुशीया मनाओ आंदोलन
थाळी बजाओ खुशीया मनाओ आंदोलनsakal
Updated on

डोंबिवली: म म मोदींचा... म म महागाईचा....देश चलाये संता बंता...बेहाल हो गई जनता, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत वाढती महागाई विरोधात मोदी सरकारचा निषेध डोंबिवलीत युवा सेनेने केला. डोंबिवलीतील इंदिरा चौकात शिवसेना युवा सेनेच्या वतीने रविवारी आंदोलन छेडण्यात आले.

पेट्रोल डिझेल सोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात देखील भरमसाठ वाढ होत आहे. या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीत रविवारी शिवसेना युवा सेनेच्या वतीने थाळी बजाओ खुशीया मनाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवासेना जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, आशुतोष सिंग यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारने मोठं मोठ्या घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात काही फायदा सामान्य जनतेला त्याचा झालेला नाही. आता पेट्रोल, डिझेल, गॅस च्या दरात देखील भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आज मोदी सरकारचा निषेध करण्यात आल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल, गॅस दर असतील किंवा भाजीपाला या सगळ्यात वाढ झाली असून त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शिवसेना पक्ष ता तळागाळातील नागरिकांसाठी झटणारा पक्ष आहे. त्यांच्या समस्यांची जाणीव असल्याने हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार कोणत्या पद्धतीने काम करत आहेत. अनेक युवक हे बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी काहीच हे सरकार करत नसून त्यांचा निषेध आज युवा सेनेच्या वतीने करण्यात आले.

दीपेश म्हात्रे, युवासेना जिल्हाधिकारी

कल्याण पश्चिमेत देखील आमदार विश्वनाथ भोईर, शितल देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.