आज सर्व ठिकाणी मानसिक स्वास्थ्य हा विषय अधिक महत्त्वाचा होत आहे. त्याचे कारण म्हणजे वाढता मानसिक तणाव, ज्याला ‘स्ट्रेस’ म्हटले जाते. आपण मानसिक आरोग्य हा शब्द ऐकतो किंवा वाचतो तेव्हा नकळत नकारात्मक गोष्टींचा विचार करू लागतो. वाढत्या सोशल मीडियामुळे सर्वत्र याच विषयावर बोलले जाते. बहुधा नेहमी वापरला जाणारा शब्द म्हणजे डिप्रेशन. अगदी ८ वर्षांचा मुलगा असो वा ५८ वर्षांची व्यक्ती, डिप्रेशन हा शब्द एकदा तरी मनात नाहीतर बोलण्यात येतोच. पण मानसिक आरोग्य चांगले देखील असू शकते, याचा विचार आपण कधी करतो का? मानसिक त्रासातून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, मला खरेच मानसिक त्रास आहे का? मानसिक स्वास्थ्यावर काम नक्कीच करावे, मात्र त्या बद्दलची वास्तविकता जाणून घेणे अधिक आवश्यक आहे. खालील मुद्दे आपल्याला वैचारिक स्पष्टता यायला मदत करतील.
#HopeOfLife : आतड्याचा कर्करोग आणि कारणीभूत घटक
१. मानसिक स्वास्थ्य म्हणजे नक्की काय?
अतिविचार करून आपण बऱ्याचदा नसलेल्या मानसिक आजारांना निमंत्रित करतो. आपल्याला काय होत आहे, याचा विचार न करता दुसरे आपल्याला काय विचार करायला सांगत आहेत, याकडे जास्त लक्ष दिले जाते. आपल्याला नक्की काय होत आहे व का होत आहे याची जाणीव आपल्या अंतर्मनातून होते, त्या वेळी आपण मानसिक स्वास्थ्याची पहिली पायरी पार करतो. आपल्या मनातील भावना, विचार याची पूर्ण स्पष्टता येणे म्हणजे मानसिक आरोग्य होय. आपले मन, आपल्याभोवती असलेली लोक, आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे याची ओळख, आपला वेळ आपण नक्की कुठे व का खर्च करतो, याची स्पष्टता येणे अधिक महत्त्वाचे ठरते.
Hope of life! कर्करोग! उपचाराचा खर्च वार्षिक कमाईपेक्षा पाच पटीने अधिक
२. मानसिक स्वास्थाची माझी व्याख्या
लोक काय म्हणतात त्यापेक्षा माझी मानसिक स्वास्थाची परिभाषा काय आहे, याची ओळख होणे आवश्यक आहे. आजच्या युगामध्ये डिप्रेशन, स्ट्रेस, अन्गझायटीसारखे मोठे शब्द सहजपणे न विचार करता वापरले जातात. आपली व्याख्या आपण केली म्हणजे आपण बाह्य शक्तीने कमकुवत बनत नाही. याचा परिणाम आपल्या अंतर्मनात दिसून येतो. आपण मानसिकरीत्या सक्षम बनू लागतो. आयुष्य थोडे हलके वाटायला लागते. आपण मार्ग काढू शकतो हा विचार येऊ लागतो. आपले विचार व भावना यांचे सिंक्रोनाइझेशन होते.
३. चूक की बरोबर यांचा गोंधळ
आपण आपले अंतर्मन जागरूक करतो त्या वेळी बऱ्याचदा आपण चूक की बरोबर याचा गोंधळ उडतो. मी केलेला विचार कोणीतरी तपासून पाहावा का, हादेखील प्रश्न पडतो. प्रत्येक व्यक्ती आपआपल्यापरीने सल्ले देते. काहीवेळा आपल्याला उपयोग होतोही परंतु, आपली मार्ग काढण्याची कार्यकुशलता नष्ट होते. अशावेळी मदत करते ती स्व-जागरूकता. कोणतीही अडचण मार्ग घेऊनच येते. तो मार्ग आपण शोधू शकतो याची खात्री आपण आपल्याशी करून घ्यावी. स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारली म्हणजे कार्यकुशलतेत वृद्धी होते.
हृदयविकार आहे? 'हे' फळ खा अन् निश्चिंत राहा!
४. माझे परिवर्तन
मनातील गोंधळ कमी झाला व आपली मानसिक कार्यकुशलता वाढली म्हणजे आपण आपला मार्ग यशस्वीरीत्या काढला आहे, हे समजून घ्यावे. आपण आपले मार्ग काढण्याची जबाबदारी व क्षमता दाखवितो त्या वेळी आपण नकळत स्व-परिवर्तनाचे शिखर गाठत असतो. कालानुरूप होण्याऱ्या वैचारिक व मानसिक बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून सहजपणे मार्ग काढणे यालाच आपण पूर्ण परिवर्तन म्हणतो.
वरील सर्व मुद्दे आपल्याला वेगळ्या विचारांचा प्रवास नक्कीच चालू करून देतील. आपले मानसिक स्वास्थ व आयुष्याचा सुखकर प्रवास ‘स्व-जागरूकता ते परिवर्तन’ या लेखमालेतून आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.