कोरोनामुळे अनिश्चितता असली, तरी हीच ती वेळ आहे जेव्हा आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो, ऐकलं, वाचलं ते आचरणात आणण्याची. थिअरी कधी प्रॅक्टिकलमध्ये आणलीच नाही, तर प्रगती कशी होणार? आपण या परिस्थितीकडे दोन प्रकारे पाहू. एक ‘मायक्रो’ दुसरा ‘मॅक्रो’.
मायक्रो : रोज जे जवळून जीवन पाहत आहोत त्याचे तपशील
मॅक्रो : मायक्रोचंच मोठं चित्र. आपण कुठे आहोत आणि आपल्याला जायचं कुठं! एकावेळी दोन्हींवर विवेकबुद्धीनं विचार केल्यास आयुष्य आणि वेळ यांचा सुयोग्य उपयोग कसा करावा ते समजेल. शरीर व मनानं सक्षम राहण्यासाठी पाच सोप्या गोष्टी आहेत.
व्यायाम
घरं लहान, माणसं खूप, मूड नाही, पुरेशी ऊर्जा नाही, कंटाळा असं अनेकांना वाटत असेल. फोन व टीव्हीचा वापर वाढल्यामुळं तासनतास बसून आहोत. अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. खूप वेळ पोक काढून बसू नMicro and Macro Thinking in Lockdown: कोरोनामुळे अनिश्चितता असली, तरी हीच ती वेळ आहे जेव्हा आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो, ऐकलं, वाचलं ते आचरणात आणण्याची.का, ताठ बसा. दिवसभरात कमीत कमी अर्धा ते पाऊण तास पूर्ण शरीर सर्व बाजूंनी पिळून निघेल, अशी आसनं किंवा व्यायाम प्रकार करा. दोन मिनिटं तरी स्पॉट जॉगिंग करा. दीर्घ श्वास घ्या.
आहार
शरीराची कमी हालचाल, उन्हाळा आदींमुळं आहार कमी ठेवणं अत्यावश्यक आहे. घरचं, साधं, पचायला हलकं, त्याचबरोबर पोटभर नाही असा आहार असावा. भुकेपेक्षा थोडे कमी खा. अधूनमधून तोंडात टाकणे, तळलेले, शिळे, वातूळ पदार्थ, अति चहा-कॉफी टाळा. अन्यथा, अपचन, गॅस, पोटात साचणारी घाण आणि जडत्व असे प्रकार वाढतील.
झोप
सकाळी उठण्याची गरज नाही म्हणून रात्री उशिरापर्यंत टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज, व्हिडिओज बघत बसू नका. प्रतिकारशक्ती फक्त व्यायामानं येणार नाही. झोपेत संपूर्ण शरीराचे इंटरनल सर्व्हिसिंग होत असतं. घरात असाल तरी झोपण्याची व उठण्याची एकच वेळ असू द्या. सकाळी लवकर उठण्याचे खूप फायदे आहेत, ते सर्व आपण पुढच्या लेखात सविस्तर पाहूच.
मानसिक आरोग्य
१. चिंता - आता पुढे कसे होणार, अशी चिंता वाटत असल्यास एरवी तरी पुढच्या क्षणी काय होणार, हे कुठे माहीत असतं आपल्याला? इथं असा विचार करणं योग्य राहील, ‘पुढं काय होणार हे माहीत नसलं, तरी कुठल्याही परिस्थितीचा सामना करायची माझी पूर्ण तयारी आहे.’
२. भीती - मला काही झालं तर? अशी भीती अनेकांना वाटत असते. याला योगात ‘अभिनिवेश’ म्हणतात, म्हणजे आपल्या देहाच्या अस्तित्वावरचं प्रेम. मला काही झाल्यास याचा अर्थ माझ्या शरीराला काही झालं तर, याची भीती!
३. काळजी - नोकरी व्यवसायाची काळजी आहे, त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे ‘सगळ्यांचं होईल तेच आपलं होईल.’ त्यामुळं घाबरू नका, स्वतःला एकटं समजू नका. दुसरं म्हणजे, ‘जे होईल त्यातून मार्ग काढू शकाल इतकी तुमची क्षमता आहे.’ स्वतःला क्षमतेपेक्षा कमी समजू नका.
४. एकटेपणा - आज उपकरणांमुळं एकमेकांतील अंतर कमी होतंय, पण एकटेपणाही वाढतोय. शारीरिक प्रशिक्षणाबरोबर मानसिक प्रशिक्षणही आवश्यक आहे. यानिमित्तानं स्वतःबरोबर रमायला शिकूया. स्वतःचे मित्र बनूया.
ध्येय - कुठलीही गोष्ट लांबून पाहिल्यास ती स्पष्ट दिसते. इथे ‘मॅक्रो
थिंकिंग’ म्हणजे आजच्या परिस्थितीचा आढावा आणि मुख्य ध्येयाचा विचार करूया. मुळात ही परिस्थिती कायम राहणार नाही. त्यामुळं छोट्या-छोट्या गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा आपलं मुख्य ध्येय गाठण्यासाठी काय करू शकतो, आपल्या ध्येयाला पूरक असे ज्ञान व कौशल्य वाढवून वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो याकडं लक्ष देऊ. एकदा विचारांची गाडी घसरायला लागली, की पुन्हा मार्गावर आणायला खूप ताकद लावावी लागते. विचारांनी थकून जाऊ नका, काळजीनं घाबरू नका आणि अनिश्चिततेनं गोंधळून जाऊ नका, कारण थकलेला, घाबरलेला आणि गोंधळलेला सैनिक लढू शकत नाही!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.