आपण इतके त्रस्त का आहोत?

आपण पाहतो की, पुष्कळ लोक उपचारासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जात आहेत. आपण एवढे त्रस्त का होत चाललो आहोत?
 इनर इंजिनिअरिंग
इनर इंजिनिअरिंगsakal
Updated on

प्रश्न : आपण पाहतो की, पुष्कळ लोक उपचारासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जात आहेत. आपण एवढे त्रस्त का होत चाललो आहोत?

सद्‌गुरू : आज ९० टक्के लोक वेगवेगळ्या मानसिक आजाराच्या अवस्थेत आहेत. एवढंच आहे, की आजाराची गुंतागुंत ही कधीकधी आपल्या नियंत्रणात असते, तर कधीकधी ती नियंत्रणाबाहेर जाते. अधूनमधून, ते काही काळ किचकट होतात आणि नंतर पुन्हा निवतात. या व्याधींना ते हाताळत आहेत, पण मानसिक वेड नक्कीच आत दडपलेलं आहे.

तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या... भीती, चिंता, मानसिक त्रास किंवा काहीही... त्यानुसार ते तुम्हाला त्याच्याशी निगडित श्रेणीमध्ये घालतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे उपचार असतात... आणि कोणत्या प्रकारचे उपचार असतात त्यांच्याकडे? काहीतरी करून ते तुमची स्थिती ताब्यात आणून; तुमचे वेड तुम्ही हाताळू शकाल तेवढे तुम्हाला ते बरे करतात, पण वेडेपणातून पूर्णपणे बाहेर काढत नाहीत. कुणीच तुम्हाला मानसिक वेडेपणातून मुक्त करू शकत नाही; कृपया हे लक्षात घ्या. अनियंत्रित वेडेपणातून ते तुम्हाला नियंत्रित वेडेपणात आणू शकतात. आज प्रत्येकाने वेडेपणा हाताळण्याची युक्ती शिकली आहे.

सर्व मानसशास्त्रज्ञांनी आणि मानसोपचारतज्ज्ञांनी फक्त आजारी माणसांचा अभ्यास केला आहे. फ्रॉईडसारख्या मनोविश्लेषकांना परीक्षणाकरिता कधीच एखादी ध्यानस्थ व्यक्ती किंवा बुद्ध भेटले नाहीत. ते फक्त अशाच लोकांचा अभ्यास करत राहिले, जे मानसिक आजारांच्या वेगवेगळ्या अवस्थेत होते... एकतर नियंत्रित वेडी माणसे किंवा अनियंत्रित. त्यांनी फक्त वेड्या माणसांचा अभ्यास केला आणि जो हा अभ्यास करतो तोसुद्धा तितकाच वेडा आहे... असे नाही की तो त्याच्या सीमित मर्यादांपलीकडे गेला आहे.

आध्यात्मिक मार्गावर वेडेपणाचा उपचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. सामान्यत: जर कोणी खरोखर वेडे झाले असतील, विशेषकरून मानसिक समस्यांमुळे, तर ते त्यांना एका मठात किंवा आश्रमात गुरूंकडे घेऊन जातात. ती व्यक्ती त्याच्या कुटुंबात राहिली असती, तर त्यांनी त्याची अति काळजी घेतली असती आणि त्याच्यासाठी सगळे काही केले असते. त्यांनी त्यांना हॉस्पिटल किंवा वेड्यांच्या इस्पितळात घेऊन गेले असते तर तिथेही त्यांची तिथल्या लोकांनी काळजी घेतली असती, सुरक्षित ठेवले असते आणि अनेक गोष्टी केल्या असत्या.

त्यांनी त्याला उदाहरणार्थ- बौद्धांच्या मठात घेऊन गेले तर तिथे त्यांना फक्त असेच सोडून देतात आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. तो ओरडतो, उधळतो, दगड मारतो, त्याने काहीही केले तरी कुणीच प्रतिक्रिया करत नाही. सर्व जण फक्त आपआपले काम करत राहतात, त्याच्या वेडेपणाला काहीही प्रतिक्रिया न देता. थोड्या दिवसांतच ती व्यक्ती स्थिर होईल आणि शांत होईल, त्याचा वेडेपणा कोणीही लक्ष न दिल्याने पुढे जाऊ शकत नाही.

वेडेपणा म्हणजे फक्त आपला ओसंडून वाहणारा अहंकार आहे. म्हणून ते त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष करतात आणि त्याला एका कोपऱ्यात ठेवतात, त्याच्याकडे लक्ष न देता. ते त्याला अगदी जेवणासाठीही बोलावत नाहीत. त्याला खरोखर खूप भूक लागली असेल तर तो येऊन जेवेल. नाहीतर फक्त तोच त्याचे वेडेपण बाहेर काढून बरा होईल. त्याठिकाणी योग्य वातावरण आणि उच्च उर्जा आहेत म्हणून तो माणूस हळूहळू स्थिर होतो आणि तोच येऊन म्हणेल, ‘मला ध्यान शिकवा.’ वेडेपणाकडे दुर्लक्ष करा आणि ते आपोआपच नष्ट होऊन जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.