योगा लाइफस्टाइल : योगा आणि क्षमाशीलता..

जाऊ द्या’. राग, दुखापत, वेदना, कटू आठवणींना धरून राहिल्यास तुम्ही स्वतःबरोबरचा योग कसा साधणार?
Vasundhara Talware
Vasundhara TalwareSakal
Updated on

स्व-प्रेमाचा उत्कट बिंदू म्हणजे क्षमाशीलता. कल्पना करा, तुम्ही ईप्सित ध्येयाकडे वाटचाल करत असताना तुमच्या डोक्यावर खूप वजनाची बॅग आहे. ती बॅग तुम्ही किती काळ वागवू शकता? काही वेळातच त्या ओझ्याखाली तुम्ही दबून जाल.

या मातील अपरिग्रहतेचे सूत्र सांगते, भूतकाळातील नको असलेले विचार, आठवणी विनाकारण वागवत बसू नका. योगात अभ्यास आणि विग्रह या दोन अत्यंत महत्त्वाच्या पैलूंवर भर दिला आहे. जीवनप्रवासातील सायकलच्या या दोन चाकांचे योग्य प्रकारे संतुलन साधल्यास तुम्ही सुसह्यपणे या गोष्टी करू शकता. इथे विग्रह (वैराग्य) म्हणजे ‘जाऊ द्या’. राग, दुखापत, वेदना, कटू आठवणींना धरून राहिल्यास तुम्ही स्वतःबरोबरचा योग कसा साधणार?

योगसाधना म्हणजे तुम्ही आणि तुमचे दैवी भाग्य यांचे अद्वैत. मात्र भूतकाळातील कटू आठवणींचे ओझे तुम्ही स्वतःपासून वेगळे कसे करू शकता, यावर खूप काही अवलंबून असते.

क्षमाशीलता हा स्वातंत्र्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. वजनाने भरलेली बॅग सोडून दिल्यास तुम्ही आल्हाददायकपणे आणि वेगाने प्रवास करू शकाल. यातून तुम्ही आनंदी व्हाल आणि तो सर्वत्र पसरवताल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे आहे तेच तुम्ही देता. तुम्ही सोडून देता, क्षमा करता त्याची जागा कृतज्ञता आणि प्रेमाने घेतलेली असते. त्या क्षणापासून योगाच्या यमाचे आणि नियमांचे पालन करणे सोपे जाते. शांतपणे डोळे मिटून स्तब्ध बसल्याने ध्यान करणे अधिक सुलभ होते.

भूतकाळातील कटू अनुभव, राग धरून ठेवणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा होत असते, असा विचार आपण वारंवार करत असतो. परंतु यातील सत्य हे आहे की, दुसरी व्यक्ती ते विसरून पुढेही गेली असेल. मात्र शरीरात असलेल्या विषारी द्रव्यांमुळे आपण प्रभावित असतो. प्रत्येक भावना, विचार आपल्या शरीरात काही रसायने सोडत असतात त्याचा आपल्या मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर परिणाम होत असतो. आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आजारांचे मूळ असते. त्यातून आपल्या शरीरातील ऊर्जेवर परिणाम होतो. कालांतराने त्याचा शरीरावरही परिणाम होऊन त्याचे मोठ्या आजारात पर्यावसन होते.

बहुतांश लोकांना क्षमा आणि स्वीकारार्हता याबाबत संभ्रम होत असतो. क्षमा करणे म्हणजे ‘जाऊ देणे’ आणि त्या योगे मनाची शांती करणे. योग किंवा विपश्चनेत आपण मैत्री, मैत्रीपूर्ण संकेत पाठवत असतो. स्वीकारार्हता दोन प्रकारची असते. समोरच्या व्यक्तीच्या जीवनाचा विशिष्ट मार्ग आहे, या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्गक्रमण करणे. दुसरी म्हणजे, तुम्ही आयुष्यभर कटू नातेसंबंध सहन करत राहणे. आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी दोन्हीपैकी कोणता मार्ग निवडायचा... हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.

आनंदी राहण्याचे मार्ग...

एक लक्षात ठेवा... क्षमा करणे तितके सोपे नाही. योगसाधनेनंतर मी दररोज करत असलेला सराव...

१) छोट्यापासून प्रारंभ : एखाद्या किरकोळ घटनेसाठी आवडत्या व्यक्तीला क्षमा करा.

२) मोठ्याने बोलण्यापूर्वी तुमच्या हृदयातील व्यक्तीला क्षमा करा.

३) क्षमापत्र : तुम्ही स्वतःला समजून सांगणारे आणि क्षमा करणारे पत्र लिहा. अर्थात, तुम्हाला काही वाटल्याशिवाय ते इतरांना पाठवायची आवश्यकता नाही.

४) तुम्हाला काय हवे आहे, ते स्वतःला विचारा. ते स्वतःला देण्याचा किंवा प्रिय व्यक्तीकडून मिळविण्याचा मार्ग शोधा.

५) ध्यानानंतर किंवा सकाळी उठल्यावर किंवा झोपायच्या आधी चांगल्याचा विचार करा.

यासाठी खालील गोष्टी करा...

अ) तुमच्यावर जिवापाड व्यक्तीची प्रतिमा डोळ्यांसमोर आणा. यानंतर मनात किंवा मोठ्याने म्हणा, ‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/ शकते.’... असे तीन वेळा म्हणा.

ब) स्वतःला डोळ्यांसमोर ठेवा आणि ‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/ शकते’...

असे तीन वेळा म्हणा.

क) कोणाला तरी डोळ्यांसमोर आणा किंवा प्रेमाने आठवा

‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/शकते’... असे तीन वेळा म्हणा.

ड) मित्राला डोळ्यांसमोर आणा आणि विचार करा आणि ‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/शकते’... असे तीन वेळा म्हणा.

इ) ओळखीच्या व्यक्तीला डोळ्यांसमोर आणा आणि ‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/ शकते’... असे तीन वेळा म्हणा.

ई) तुम्हाला दुखावलेल्या व्यक्तीला डोळ्यांसमोर आणा आणि ‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/ शकते’... असे तीन वेळा म्हणा.

उ) तुम्ही तिरस्कार करता अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर आणा आणि ‘मी आनंदी असून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/ शकते’... असे तीन वेळा म्हणा.

ऊ) संपूर्ण ब्रह्मांड डोळ्यांसमोर आणा आणि ‘मी आनंदी असून, सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो/ शकते’... असे तीन वेळा म्हणा.

तुम्हाला हृदयात असलेल्या सर्व व्यक्तींबद्दल प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत ही साधना करत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.