आपण आधी योगश्चित्तवृत्तिनिरोधः या शब्दाचा अर्थ समजून घेऊ यात. चेतनेच्या चढ-उतारांची समाप्ती असा याचा अर्थ असून, यातील चित्त म्हणजे योगा.
योगा : एकरूप किंवा एकत्रीकरण. आता तुम्ही विचाराल कशाचे एकत्रीकरण? अगदी सरळ आहे, आपल्यातील बाह्यस्तर अंतर्मनाशी एकरूप होणे होय. म्हणजेच, आपल्यातील पेशींचे स्नायूंशी, मनाशी, बुद्धीशी आणि आत्म्याचे एकत्रीकरण होणे. यात एक गोष्ट प्राधान्याने लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही योगाच्या कोणत्याही तंत्राचा सराव करत असताना बाह्यस्तर आणि अंतर्मन एकरूप होत नाही, असे जाणवते त्या वेळी तुम्ही योगा करत नाहीत. तुम्ही करता ते केवळ उपचार किंवा दुसरी क्रिया असते. योग हा काही उपक्रम नाही, ती एक आध्यात्मिक साधना आहे.
चित्त : चित्त याचा अर्थ लक्षात घेणे, जाणीव असणे किंवा एखादी गोष्ट समजून घेणे. म्हणूनच चित्त ही वैयक्तिक जाणीव, चेतना आहे. चेतनेच्या या वैयक्तिक अवस्थेत मनाची जागरूक, अवचेतन आणि बेसावध अवस्था यांचा समावेश असतो. चैतन्याचा चौथा परिणाम म्हणजेच आत्मा. चित्त हे निरीक्षणाचे वहन करणारे आहे. ते मानस, बुद्धी आणि अहंकाराने बनलेले आहे. त्याची अनुभूती, संकल्पना आणि क्रिया ही तीन कार्य आहेत. चित्ताशिवाय फक्त आत्मा उरतो. योगाचा आपला आध्यात्मिक प्रवास म्हणजे आत्मा साकारणे.
वृत्ती : वृती म्हणजे मनाचे चढउतार, वर्तन, नमुने आणि अस्तित्वाची स्थिती. जितक्या जास्त वृत्ती तितकी जास्त अस्वस्थता. महर्षी पतंजली हे सर्वकालीन महान मानसशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी चित्तवृत्तींचे पाच प्रकार केले आहेत. त्यांनी असे सांगितले, की आपल्याला ज्याचा त्रास होतो, त्याची श्रेणी कोणती आहे, हे आपण जागरूकपणे ओळखल्यास त्याचा नायनाट करू शकतो. त्याचा अर्थ पुढे आहेच. भविष्यातील पाच चित्तवृत्तींची आपण माहिती घेऊ यात.
निरोध : याचा अर्थ उच्चाटन, समाप्ती, थांबणे. कोणत्याही प्रक्रियेला अवरोध करणे, म्हणजे मूलभूत गोष्टींना अडथळा आणणे असा होत नाही. जागरूकतेच्या आकृतिबंधाला अवरोधित करण्याची कृती आहे. म्हणजे स्वजागरूकता नव्हे. तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा जागरूकतेच्या बेसावध स्थितीत प्रवेश करता. त्यावेळी तुमचे शरीर मेंदूचे काय होते? दोन्ही मृतावस्थेत जाते का? किंवा याचा जरा वेगळ्या प्रकारे विचार करूयात. शरीराची आणि मानसिक जागरूकतेचा प्रवाह रोखण्याची ही प्रक्रिया आहे का? निश्चितच ही एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये तुमचा खरा अर्थाने उदय होतो. तुमच्याशी जोडलेल्या सर्व गोष्टी विरघळून जातात. सकाळी जागे झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले चित्त पूर्ण गतीने काम करत असते. विश्लेषण करणे, विच्छेदन करणे, निष्कर्ष काढणे आदी प्रक्रिया चित्त करत असते. चित्ताने काढलेल्या निष्कर्षामुळे आपण एकतर आनंदी किंवा दुःखी होत असतो.
दुर्दैवाने चित्ताच्या निष्कर्षामुळे आपल्याला आनंदापेक्षा दुःख जास्त होते. आपण सध्याचेच उदाहरण पाहू. दिवाळीमुळे सर्व घरांतून स्वच्छता मोहीम सुरू झाली असेल. या काळात मोलकरणीने एक आठवड्यासाठी सुटी घेतली तर जग असे कसे आहे, आपण किती असहाय आहोत, याबद्दल शेकडो नकारात्मक गोष्टी आपल्या मनात तयार होतील. हे सर्व चित्त करत असते. हेच चित्त हेही म्हणू शकते, बाह्या सावरा आणि तुमच्या घराच्या स्वच्छतेचा आनंद लुटा. तुम्ही तुमच्या स्नायूंना, सांध्यांना, हाडांना सर्वांग सुंदर व्यायाम देऊ शकता. मेहनतीची चमक तुमच्या शरीरावर दिसेल. हे सर्व मनाचे चढउतार आहेत. ते थांबवत आपण कर्तव्य म्हणून योग्य असेल ते करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. योगा म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, सर्व गोष्टी सोप्या आणि सुसह्य करून त्याची अधिकाधिक अनुभूती घेण्याची प्रक्रिया आहे. पुढील सूत्रात योगा करणे म्हणजे नक्की काय अनुभव येतो, त्याची माहिती घेऊयात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.