नागपूर: दगा दिलेल्या प्रेयसीला संपविण्याचा कट रचला. मित्रांच्या मदतीने पिस्तूल खरेदी करून प्रेयसीचा काटा काढणार तोच नंदनवन पोलिसांनी घटनेपूर्वीच अटक केली.
जावेद इसाक पठाण (३१) रा. ब्राम्हणी, कळमेश्वर आणि परीस ऊर्फ पुष्पा राजू उईके (२३) रा. धरती माँ नगर, वाठोडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार बागडे ऊर्फ मायकल रा. कळमेश्वर हा फरार होण्यास यशस्वी झाला. पोलिसांनी पिस्तूल व चाकू जप्त केला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परीस याचे एका युवतीवर प्रेम होते. मात्र, ती युवती दुसऱ्याच्या प्रेमात पडली. प्रेमात दगा मिळाल्याने परीसला प्रेयसीचा काटा काढायचा होता.
त्यासाठी त्याने कळमेश्वरचे दोन मित्र मायकल आणि जावेद यांनी पिस्तूलची व्यवस्था करायला सांगितले होते. त्यांनी पिस्तूल विकत घेतले आणि सोमवारी रात्री आठ वाजता जगनाडे चौकात आले. तेथे प्रेयसीच्या खुनाचा कट रचला. तिघेही तेथून हसनबाग चौकात आले.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गोकूल सूर्यवंशी, उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या पथकाला माहिती मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी जावेद आणि परीस यांना ताब्यात घेतले
तर मायकल पसार होण्यात यशस्वी झाला. आरोपींकडून पिस्तूल व एक चाकू जप्त करण्यात आला. मायकलचा पोलिसांनी पाठलाग केला पण तो निसटला. त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.