Nagpur: राज्य मार्ग परिवहन महामंडळ बँकेच्या १९ जागांसाठी निवडणूक; कर्मचाऱ्यांवर आश्वासनांचा पाऊस

विविध मुद्द्यांवर प्रचार; संचालकांच्या १९ जागेसाठी शुक्रवारी मतदान
Nagpur
Nagpuresakal
Updated on

नागपूर: स्टेट ट्रान्स्पोर्ट को- ऑपरेटिव्ह बँक लि. या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये संचालकांच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ जूनला मतदान होणार आहे.

बँकेची सत्ता आपल्याच संघटनेच्या हाती यावी, म्हणून एसटीच्या आगारात आणि विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना आश्वासने देणारे विविध मुद्दे घेऊन प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बँकेच्या संचालकांची निवडणूक येत्या शुक्रवारी २३ जूनला होत आहे. वर्षाची ४ हजार कोटीची उलाढाल या एसटी बँकेची आहे.

Nagpur
Bogus Fertilizers Selling Ban: जिल्ह्यातील 18 विक्रेत्यांचे परवाने निलंबित; ZP कृषी विभागाची कारवाई

त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फिक्स डिपॉझिट अडीच हजार कोटीचे आहे. हजारो कोटींचा हा व्यवहार असल्याने एसटी बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटी बँकेची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. मात्र, कोरोनाचे दोन वर्ष गेल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता सात वर्षांनी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांबरोबरच कर्मचारी सभासदांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे.

राज्यभरात प्रचाराचा धडाका

एसटी कर्मचारी संघटनेच्या सहा पॅनलकडून ही निवडणूक लढविली जात आहे. त्यात काही अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत. संचालकांच्या १९ जागेसाठी तब्बल १४३ उमेदवार मैदानात आहे.

राज्यभरातून ६८ हजार ३०० मतदार सभासद आपल्या पसंतीच्या संचालकांना निवडून देणार आहे. त्यासाठी राज्यभराततील एसटीच्या कार्यालय आणि आगारात रॅली व सभा घेऊन प्रचाराचा धडाका सुरू होता. बुधवारी सायंकाळी प्रचार थंडावला.

Nagpur
Gondia: कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई; अनेक त्रुट्या आढळल्याने जिल्ह्यातील ४३ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

या ठिकाणी होणार मतदान

राज्यातील २५० आगार आणि सर्व विभागीय कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कर्मचारी संघटनांचे राज्यातील मोठे नेते प्रचारासाठी येऊन गेले आहेत.

सर्वांनाच आपला पॅनलचा विजय होईल, असा विश्वास आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या निवडणूक प्रक्रियेत बँकेची चावी कुणाच्या हातात येईल, हे २५ जूनला निकालाच्या दिवशी कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.