Nanded News : शहरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. महापालिकेच्या तपासणीत शहरातील १३२ इमारती धोकादायक श्रेणीत असल्याचे आढळून आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाने संबंधितांना केवळ नोटीस पाठवण्याशिवाय कोणतेही पाऊल उचललेले नाही.
दरम्यान यापैकी काही इमारतींनी धोकादायक ईमारतील पाडून नवीन बांधकाम सुरू करण्याची लगबग संबंधितांनी सुरू केली आहे. धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये अनेक जुन्या आणि जीर्ण इमारतींचा समावेश आहे.
या इमारतींमध्ये अनेक ठिकाणी तडे गेले असून, छताचे खांब कमजोर झाले आहेत त्यामुळे त्यांचा पाया ढासळण्याची स्थिती आहे. महापालिकेने या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या तरीही काहीच परिणाम दिसून आला नाही.
इमारतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे रहिवाशांचा जीवास धोका आहे. महापालिकेने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, अशा ईमारतींवर पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याचे ठरवले होते परंतु अनेक ईमारतींना नोटीसही देण्यात आल्या नसल्याची माहिती आहे.
याबाबत कठोर कारवाई होत नसल्याने या विषयाचे गांभिर्य संबंधित ईमारतीच्या मालकांना नाही. या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची गरज आहे. याबाबत महापालिकेचे लवचिक धोरणही कारणीभूत आहे. त्यामुळे धोकादायक ईमारती शहरात उभ्या आहेत.
नांदेड शहरात सहा क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून शहराची विभागणी करण्यात आली आहे. यात तरोडा, वर्कशॉप, गणेशनगर, वजिराबाद, ईतवारा, सिडको या ठिकाणी नांदेड महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आहेत.
या कार्यालयांनी मोडकळीस आलेल्या ईमारतीबाबत झोन अंतर्गत पाहणी करून माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविली होती. मात्र या जीर्ण ईमारतीवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
धोकादायक ईमारतींविषयी अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदर माहिती झोन प्रमुखांकडून घ्यावी असे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सांगितले. त्यानुसार झोन प्रमुखांशी संपर्क साधला असता काहींनी माहिती दिली तर काहींकडून प्रतिसाद मिळाला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.