नांदेड परिमंडळातील 82 हजार वीजग्राहकांकडे 150 कोटी 56 लाख थकबाकी

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघूदाब वर्गवारीतील 82 हजार 436 वीजग्राहकांनी नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या आठ महिन्यांच्या कालावधीत एकाही पैशाचे वीजबील भरलेले नाही.
परिमंडळ महावितरण, नांदेड
परिमंडळ महावितरण, नांदेड
Updated on

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळाची थकबाकी वसूली मोहीम सध्या जोरदारपणे सुरु आहे. वीजग्राहकांकडून या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद मीळत असला तरी गेल्या आठ महिन्यांपासून 82 हजार 436 वीजग्राहकांनी वीजबिलाचा एक पैसाही भरलेला नाही. तब्बल 150 कोटी 56 लाख रुपयांची थकबाकी या वीजग्राहकांकडे आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघूदाब वर्गवारीतील 82 हजार 436 वीजग्राहकांनी नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या आठ महिन्यांच्या कालावधीत एकाही पैशाचे वीजबील भरलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महावितरणने गेल्या दीड वर्षात एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा बंद न करता अखंडीतपणे वीजपुरवठा केलेला आहे. मात्र नियमीत वीजबील भरणाऱ्या वीजग्राहकांचा अपवाद वगळता वीजबील भरण्याकडे अद्यापही अनेक ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याशिवाय महावितरणकडे आता पर्याय उरलेला नाही.

हेही वाचा - आपल्या काळ्या आईची सेवा करित कष्टाने अन्नधान्न पिकवतो. अशाच अर्धापुरातील शेतकरी कुटंबातील तरुणांनी नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

नांदेड जिल्ह्यातील 23 हजार 204 वीजग्राहकांनी 15 कोटी 58 लाख थकवत गेल्या आठ महिन्यापासून एकही बील भरलेले नाही. यामध्ये भोकर विभागाच्या 5 हजार 588 वीजग्राहकांनी 3 कोटी 73 लाख, देगलूर विभागातील 7 हजार 718 वीजग्राहकांनी 5 कोटी 10 लाख, नांदेड ग्रामीण विभागातील 5 हजार 110 वीजग्राहकांनी 2 कोटी 90 लाख तर नांदेड शहर विभागातील 4 हजार 788 वीजग्राहकांनी 3 केाटी 85 लाख रूपये थकवले आहेत. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 608 वीजगाहकांनी 11 कोटी 32 लाख रूपये थकवले आहेत तर परभणी जिल्ह्यातील 43 हजार 624 वीजगाहकांनी 123 कोटी 66 लाख रूपये थकवले आहेत.

आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने आता सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे चालू देयक व थकबाकी वसुलीसाठी सर्व कार्यालयातली कर्मचारी व अधिकारी यांची विविध पथके तयार करून शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वीजग्राहकांनी महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेवून आपल्या वीजबिलांचा भरणा त्वरीत करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.