नांदेड तालुक्यात ३७ महिलांना मिळणार सरपंचपदाचा मान 

नांदेड - नांदेड तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बचत भवन येथे मंगळवारी काढण्यात आली. 
नांदेड - नांदेड तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बचत भवन येथे मंगळवारी काढण्यात आली. 
Updated on

नांदेड - नांदेड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या २०२० ते २०२५ या वर्षासाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी (ता. दोन) बचत भवन येथे झाली. ७३ जागांपैकी ३७ जागांवर महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तसेच अनुसुचित जाती प्रवर्गासाठी १८, अनुसुचित जमातीसाठई एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २० तर सर्वसाधारणसाठी ३४ जागांचा समावेश आहे. 

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे सोडत काढण्यात आली. यावेळी नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, उर्मिला कुलकर्णी, विजय पाटे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

अनुसुचित जाती - जमातीसाठी राखीव
तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अनुसुचित जाती - सायाळ, फत्तेपूर, वाडी पुयड, नेरली, मरळक खुर्द आणि बुद्रुक, चिमेगाव, सिद्धनाथ, वानेगाव - वरखेड - भानपूर, राहटी बुद्रुक, अनुसुचित जाती (महिला) - वाडी बुद्रुक, खडकुत - ऐमशेटवाडी, निळा, कामठा खुर्द, गोपाळचावडी, वडवणा- खडकी, सुगाव खुर्द, वडगाव, पासदगाव तर्फे काकांडी. अनुसुचित जमाती महिला - चिखली बुद्रुक. 

ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्ग
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - बोंढार तर्फे हवेली, कल्हाळ, तुप्पा, नसरतपूर - हस्सापूर, वांगी, वाहेगाव, सुगाव बुद्रुक, वाघी, ढोकी, पुयनी, ओबीसी (महिला) - पोखर्णी, पिंपरी महिपाल, बळीरामपूर, जैतापूर, दर्यापूर, धानोरा, चिखली खुर्द, थुगाव, मार्कंड, राहेगाव. सर्वसाधारण - बोंढार तर्फे नेरली, धनेगाव - मुझामपेठ, काकांडी तर्फे तुप्पा, सोमेश्वर, त्रिकुट - वाडी जांजी, बाभूळगाव, किकी, धनगरवाडी, गाडेगाव, पिंपळगाव निमजी, बोरगाव तेलंग, नागापूर, वाजेगाव, पिंपळगाव कोरका, भनगी, पुणेगाव. सर्वसाधारण (महिला) - गंगाबेट, तळणी, एकदरा, लिंबगाव, कोटतीर्थ, इंजेगाव, आलेगाव, ब्राह्मणवाडा, गुंडेगाव, नाळेश्वर, नांदुसा - भालकी, विष्णुपुरी, पांगरी, खुरगाव, खुपसरवाडी, भायेगाव आणि कासारखेडा. 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
 
नायब तहसीलदार व तहसीलदारांचे आंदोलन 

दरम्यान, उमरखेड (जि. यवतमाळ) येथील नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने सामुहिक रजा आंदोलन मंगळवारी (ता. दोन) दुपारी करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण, संजय नागमवाड, मुगाजी काकडे, सारंग चव्हाण, सुनील माचेवाड, विजय पाटे, मारोतराव जगताप, जे. जे. इटापल्ले, डी. एन. जाधव, मकरंद दिवाकर, व्यंकटेश मुंडे, विजय येरावाड आदी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.