Nanded Water Storage : विष्णुपुरी धरणात ४७.३० दलघमी पाणीसाठा; दमदार पावसामुळे १२.६७ दलघमीने वाढ

नांदेडकरांची तहाण भागविणाऱ्या ‘विष्णुपुरी’त सध्या ४७.३० दलघमी साठा असून त्यात १२.६७ दलघमीने वाढ झाली आहे. दरम्यान, उच्चपातळी ९ बंधाऱ्यांतील पातळीत मात्र घट आहे.
47 percent water storage in vishnupuri Dam Increase by 12 percent due to heavy rains
47 percent water storage in vishnupuri Dam Increase by 12 percent due to heavy rainsSakal
Updated on

नांदेड : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पात येवा सुरू झाला असून जिल्ह्यातील १०४ मध्यम व लघु प्रकल्पात १७६.२९ दलघमी उपयुक्त साठा असून यात १३.९२ दलघमीने वाढ झाली आहे.

नांदेडकरांची तहाण भागविणाऱ्या ‘विष्णुपुरी’त सध्या ४७.३० दलघमी साठा असून त्यात १२.६७ दलघमीने वाढ झाली आहे. दरम्यान, उच्चपातळी ९ बंधाऱ्यांतील पातळीत मात्र घट आहे. नांदेड पाटबंधारे विभागाच्या १८ जुलैच्या साप्ताहिक पाणीपातळी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा येण्यास सुरूवात झाली आहे.

प्रकल्पाच्या परिसरात पंधरा दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडत आहे. तापमानातही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू १०४ प्रकल्प आहेत.

यात १७६.२९ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी ५८.५५ इतकी आहे. यात गोदावरीवरील काळेश्वर येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात गेल्या आठवड्यात ३४.६३ दलघमी साठा होता. त्यात १२.६७ दलघमी वाढ होऊन सध्या ४७.३० दलघमी उपयुक्त साठा आहे. त्याची ५८.५५ इतकी टक्केवारी आहे.

मानार प्रकल्पात मागील आठवडयात ३१.८४ दलघमी इतका साठा होता. यात ५.३६ दलघमीने वाढ होऊन ३७.२० दलघमी साठा झाला असून त्याची टक्केवारी २६.९२ इतकी आहे. तसेच मध्यम ९ प्रकल्पात मागील आठवडयात २३.३९ दलघमी साठा होता, यात ६.२ दलघमीने वाढ होऊन २९.५९ दलघमी उपयुक्त साठा झाला आहे. त्याची टक्केवारी २१.२७ इतकी आहे.

उच्चपातळी बंधाऱ्यांतील साठ्यात घट

उच्च पातळी ९ बंधा-यात मागील आठवडयात ४५.१० दलघमी उपयुक्त साठा होता. यात १६.१३ दलघमीने घट होऊन २८.९७ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १५.२६ इतकी झाली आहे. तर, ८० लघु प्रकल्पात मागील आठवडयात २७.४१ दलघमी पाणी साठा होता. यात ५.८३ दलघमीने वाढ होऊन ३३.२४ दलघमी उपयुक्त साठा आहे. त्याची टक्केवारी १९.२३ इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.