Nanded News : शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडचे यश; राज्य गुणवत्ता यादीत २५ विद्यार्थी चमकले

राज्य गुणवत्ता यादीत २५ विद्यार्थी चमकले : बैठकांतून केली होती जनजागृती
scholarship
scholarshipsakal
Updated on

नांदेड : १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परिक्षेत नांदेड जिल्ह्याने उज्जवल यश मिळवले आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीचे दोन हजार ३४३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर राज्य गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील येऊ घातलेल्या अनेक स्पर्धा परीक्षेंचा पाया असतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडूच या लहान वयापासूनच मिळत असते. नेमक्या याच बाबींचा पाया पक्का व्हावा, या उद्देशाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यात पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.

scholarship
Scholarship Exam Result : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकमध्ये पहा रिझल्ट

जिल्ह्यात ता. १२ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेस विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद नोंदवित ९६ टक्के उपस्थिती नोंदवली होती. पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीसाठी जिल्ह्यातून २४ हजार ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३ हजार २३४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. ही एकूण टक्केवारी ९६.५७ टक्के नोंदविण्यात आली. माध्यमिक इयत्ता आठवीसाठी १७ हजार ८७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १७ हजार २७३ विद्यार्थी उपस्थित होते. ही एकूण टक्केवारी ९६ टक्के नोंदविण्यात आली.

scholarship
Scholarships: विद्यार्थांसाठी गुड न्यूज! परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ

इयत्ता पाचवीसाठी तीन हजार ५२१ विद्यार्थी पात्र झाले होते. त्यात ४८५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता आठवीसाठी एक हजार ८५८ विद्यार्थी पात्र असून ४६६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. या शिवाय राज्य गुणवत्ता यादीमध्ये नांदेडच्या एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

scholarship
Nanded News : नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व विविध बैठकांतून व्यक्त केल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी सोळा तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांना प्रोत्साहित करुन शिष्यवृत्ती परीक्षेची आवश्यकता पटवून दिली होती. त्यामुळेच राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी संख्यावाढ होण्यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.