नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सामान्य होताना दिसून येत आहे. उपचारानंतर बरे होणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६.४ टक्के इतके झाले आहे. सोमवारी (ता. सात) प्राप्त ९९७ अहवालापैकी ६३ अहवाल बाधित आले आहेत. ३२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सोमवारी दिवसभरात एकाही गंभीर बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. (Nanded Corona News Update)
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ५६३ एवढी झाली असून यातील ९८ हजार ४७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत ३३, लोहा चार, मुदखेड दोन, मुखेड पाच, देगलूर एक, किनवट दोन, माहूर एक, धर्मबाद दोन, हिमायतनगर दोन, परभणी पाच, औरंगाबाद एक, अर्धापूर तीन, वाशीम एक, उमरखेड एक असे एकूण ६३ बाधित आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी २७, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५९२, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात ७२०, देगलूर दोन, खासगी रुग्णालयातील ३२ असे एकूण एक हजार ३७६ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड कोरोना मीटर
एकूण बाधित ः एक लाख दोन हजार ५३६
एकूण बरे ः ९८ हजार ४७७
एकूण मृत्यू ः दोन हजार ६८३
सोमवारी बाधित ः ६३
सोमवारी मृत्यू ः शून्य
सोमवारी बरे ः ३२५
उपचार सुरु ः एक हजार ३७६
गंभीर रुग्ण ः चार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.