चौकशीच्या वेळी गैरहजर असणे आले अंगलट, ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

राजकीय वजन ठेवून असलेल्या ग्रामसेवकाच्या तडकाफडकी निलंबनाने नायगाव पंचायत समितीमध्ये खळबळ
 suspended
suspended sakal
Updated on

नायगाव (जि.नांदेड) : चौकशीच्या वेळी गैरहजर राहणे रातोळीच्या ग्रामसेवकाच्या अंगलट आले असून. कर्तव्यात कसूर व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करण्याचा ठपका ठेवून गटविकास अधिकाऱ्यांनी एस.जी. वडजे यांना तडकाफडकी निलंबित केले असून (ता.२७) रोजी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

रातोळी येथे कार्यरत असतांना आपल्या कार्यशैलीने वादग्रस्त ठरलेले ग्रामसेवक एस.जी. वडजे यांनी १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामात अपहार केल्याचा आरोप असून. सदर प्रकरणी अंकूश पाटील रातोळीकर यांनी चौकशी करण्याची मागणी केली होती. वडजे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता व सरपंचाच्या संगणमताने जवळपास २० लाखाचा अपहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 suspended
पुढे ढकललेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

तक्रारीनंतरही गटविकास अधिकारी चौकशी करण्यास गटविकास अधिकारी तयार नव्हते पण वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकांनी काढले होते. विस्तार अधिकारी एस.आर. कांबळे हे (ता.२४) रोजी चौकशीसाठी गेले असता ग्रामसेवक वडजे है गैरहजर होते. त्यामुळे सदर प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गटविकास अधिकारी पी.पी. फांजेवाड यांनी सोमवारी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

काढलेल्या निलंबनाच्या आदेशात रातोळी ग्रामसेवक वडजे यांनी पदभार न घेणे व न देणे, कामात निष्काळजीपणा करणे, कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे व पंचायत समितीला अहवाल न सादर करणे असा ठपका ठेवण्यात आला असून. ही कृती महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तक) नियम १९८७ नियम उल्लंघन करणारी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नियम ३ नुसार त्याची वागणुक सचोटीची दिसून येत नाही. कर्तव्यात कर्तव्यपरायनता दिसून येत नाही या कारणामुळे एस. जी. वडजे ग्रामसेवक यांना आदेश निर्गमनाच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतुन निलंबित करण्यात येत आहे. राजकीय वजन ठेवून असलेल्या ग्रामसेवकाच्या तडकाफडकी निलंबनाने नायगाव पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.