नांदेड ः बाबानगर भागात केलेल्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.दोन) निरेश उर्फ निरु श्यामबाबू परिहार (वय २०, रा.विष्णुनगर) या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरीक्षक दशरथ आडे, श्रीराम दासरे, जसपालसिंघ कालो आदींनी ही कारवाई केली. सदर आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोविंदनगरात ६० हजारची घरफोडी
नांदेड ः गोविंदनगर येथील रमेश उपासराव राठोड यांच्या घरी २६ मार्च ते दोन एप्रिलदरम्यान चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून रोख ६० हजार रुपये, कपाटातील प्लाॅटची रजिस्ट्री व सोन्याच्या दागिण्याची पावती चोरून नेली आहे. रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघमारे तपास करत आहेत.
हेही वाचा - नांदेड : निष्पापावर अन्याय होणार नाही; मात्र दोषींना सोडणार नाही- पोलिस अधीक्षकांची तंबी
जिल्ह्यात दोन दुचाकींची चोरी
नांदेड ः महाटी (ता.मुदखेड) येथील बळवंत बालाजी यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच-२६, एएन-६५९२) घरासमोरून एक एप्रिल रोजी चोरीला गेली आहे. त्यांच्या माहितीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच रातोळी (ता.नायगाव) येथील संभय्या शिवय्या मठपती यांची दुचाकी (एमएच-१२, बीएल-६९४५) आमदार रातोळीकर यांच्या घरासमोरून एक ते दोन एप्रिलदरम्यान चोरीला गेली आहे. संभय्या यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ओरडू नका म्हटल्याने मारहाण
नांदेड ः रेजाबाई व्यंकटराव कल्याणे यांच्या मुगट (ता.मुदखेड) येथील घरासमोर काही मुलो जोरजोरात ओरडून खेळत होती. दरम्यान रेजाबाई यांचा मुलगा गणपती कल्याणे याने मुलांना ओरडू नका म्हणून सांगितले. दरम्यान ओरडणाऱ्या मुलांपैकी बंटी पावडे, सतीश बाबुराव कल्याणे यांनी गणपती कल्याणे यांना मारहाण केली. आई मधात सोडवायला आली असता त्यांनाही चाकुने मारहाण करून जखमी केले. जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे रेजाबाई कल्याणे यांनी ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, श्री. बाचेवाड तपास करत आहेत.
हे देखील वाचाच - जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचा दणका : एका खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल; अनेकांचे धाबे दणाणले
नालंदानगरात गळभास घेऊन आत्महत्या
नांदेड ः त्रिंबक नारायण निवळंगे (वय ५२, रा. नालंदानगर) यांनी दोन एप्रिल रोजी घरातील लोखंडी अॅंगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्योती त्रिंबक निवळंगे (रा. श्रीनगर) यांनी दिलेल्या माहितीवरून विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.