भोकर (जिल्हा नांदेड) : भोकर तालुक्यातील दिवशी येथील एका पाच वर्षीय बालिकेवर सालगड्याने अत्याचार करुन तिचा निर्घृण खून करुन पुरावा नष्ट करण्यासाटी तिचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. या प्रकरणातील नराधमास भोकर येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मंगळवारी (ता. 23) मार्च रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय ऐकण्यासाठी तालुक्यातील अनेकांनी भोकर न्यायालयात गर्दी केली होती. हा न्यायनिवाडा अवघ्या 59 व्या दिवशी लागल्याने अशा प्रकारचा निकाल राज्यात पहिलाच असल्याचे बोलल्या जात आहे. खऱ्या अर्थआने पिडीतेला न्याय मिळाल्याच्या भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होत्या.
भोकर तालुक्यातील दिवशी येथील पाच वर्षीय बालिका आपल्या आई- वडिलांसोबत शेतात गेली होती. ता. 20 जानेवारी रोजी सकाळी सात ते दहाच्या सुमारास तिच्या घरची मंडळी शेतातील कांदे काढत होते. यावेळी बाबूराव सांगेवार याने म्हैस व अन्य जनावरे चारुन आणुन गोठ्यात बांधले होते. यानंतर त्याने शेतमालकाच्या बालिकेला उचलून नेले. एका नाल्यात गेल्याने तिला आणण्यासाठी गेल्यानंतर नराधम सालगडी बाबूराव सांगेवार याने पिडीत बालिकेला आमिष दाखवून काही अंतरावर नदी परिसरात उचलून नेले. एका नाल्यात तिच्यावर त्याने पाशवी अत्याचार केला एवढेच नाही तर तिचा गळा आवळून नदीपात्रात फेकून दिले. बाजूच्या बेशरम व पानसरांच्या झाडीत तो नग्न अवस्थेत लपून बसला.
तिकडे बालिकेचा शोध सुरु झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पालकांच्या समोर पडला. मृत अवस्थेत सदर बालिकेच्या शरीरावर जवळपास 47 जखमा झाल्या होत्या. मृतदेहाच्या बाजूलाच आरोपीचे बूट, कपडे व पाकीट आढळून आले होते. त्याचा शोध घेतला असता तो एका झुडूपात दडून बसला होता. त्याला ताब्या घएऊन भोकर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी बाबूराव सांगेवार याच्याविरुद्ध खून, अपहरण, अनैसर्गिक अत्याचार, अत्याचार यासह बाललैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता.
या प्रकरणाचा तपास अवघ्या 19 दिवसांमध्ये भोकर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास पाटील यांनी लावून ता. 10 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात एकूण 15 साक्षीदार तपासले. फिर्यादी, साक्षीदारांची साक्ष, पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आधारे आरोपीस दोषी ठरवून न्यायाधीश एम. एस. शेख. यांनी आरोपी बाबुराव सांगेवार याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. आशिष गोधमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे सरकारी वकिल रमेश राजूरकर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. स्वप्निल कुलकर्णी व सलीम शेख यांनीही मदत केली. तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डेडवाल यांनी परिश्रण घेतले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.