नांदेड : सात वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपी मनोज शंकर पतंगे यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
Police Arrest
Police Arrestsakal
Updated on

नांदेड : मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीस वजिराबाद ठाण्याच्या डीबी (Wazirabad police station) पथकाने सोमवारी (ता.१७) जानेवारी रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी मनोज शंकर पतंगे (Manoj Shankar Patange)यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.नगीना घाट (Nagina Ghat) परिसरातील तुळजाभवानी मंदिर परिसरात (ता.तीन) डिसेंबर २०१४ रोजी आकाश भगवान पवार या तीन आरोपींनी चोरी करण्यास सोबत चल असे म्हणाले तेव्हा आकाशने त्यास नकार दिला.

Police Arrest
नांदेड : पुढील आठवड्यापासून 'एसटी' प्रवास सुरळीत होणार

यावेळी आरोपींनी आकाशच्या मानेवार तलवारीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी मनोज शंकर पतंगे हा फरार होता. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात वजिराबाद पोलिसांनी सुचना केल्या होत्या. त्यानुसार ठाण्याच्या पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार, पोलिस नाईक विजय नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, शेख इमरान शेख एजाज यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनोज पतंगे हा राहत्या घरी आल्याचे कळताच धाड टाकून सदरील आरोपीस ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()