Nanded News : देगलूर शहरात उघड्यावरील मांस विक्रीवर कारवाईचा बडगा

देगलूर तालुक्यात २९ मांस विक्रेत्यांना प्रशासनाने दिल्या नोटिसा
nanded
nandedsakal
Updated on

देगलूर : शहरातील नागार्जून बौद्ध विहार, सिद्धार्थ नगर, गडी गल्ली, मोमीन गल्ली व अरबी शाळेलगत विनापरवाना व बेकायदेशीररित्या चालवत असलेले उघड्यावरील मांस विक्रीच्या दुकानावर पालिकेचे नूतन आलेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून अशा विक्रेत्यांना कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशाच पद्धतीने मुख्याधिकारी चव्हाण यांनी शहरातील वाढलेले अतिक्रमण याकडेही पहावे अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेची कोणतीही परवानगी नसताना व बेकायदेशीररित्या सार्वजनिक रस्त्यावर तसेच शहरातील नागार्जुन बौद्धविहार, सिद्धार्थ नगर, गडी गली कमानी पर्यंतच्या रस्त्यावर तसेच मोमीन गल्ली अरबी शाळेलगत रस्त्यावर उघड्यावर मांस विक्रीची दुकाने व अवैध जनावरांच्या कत्तलीमुळे या भागात विविध आजाराचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. या भागातील नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत आहे. गोवंशाची खुलेआम तस्करी व कत्तल होत असल्यामुळे जातीय तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जनावरांच्या कत्तलीमधून निघालेले मांसचे तुकडे हे मोकाट कुत्र्यांचे खाद्य असल्यामुळे कुत्रे कळपाने वावरतात.

या भागातील नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत आहे. गोवंशाची खुलेआम तस्करी व कत्तल होत असल्यामुळे जातीय तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जनावरांच्या कत्तलीमधून निघालेले मांसचे तुकडे हे मोकाट कुत्र्यांचे खाद्य असल्यामुळे कुत्रे कळपाने वावरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.