Nanded : शिधा पोचविण्यासाठी प्रशासन घेत आहे परिश्रम

आमदार बालाजी कल्याणकर : पाच लाख ९७ हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’
Nanded
Nanded sakal
Updated on

नांदेड : राज्यातील गोरगरिबांच्या घरीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ ही विशेष योजना राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविण्यात यश मिळविले आहे. स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल अशी किट शासनाने उपलब्ध करून दिली. त्याचा प्रातिनिधिक शुभारंभ रविवारी झाला.

आनंदनगर परिसरातील रास्त भाव दुकान क्र. ८९ येथे यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले आदी उपस्थित होते.

आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले की, आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. या विस्तारात वाड्या-पाड्यांपर्यंत ही आनंदाची शिधा वेळेत पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या सर्व बांधवांच्या घरी ही गोड दिवाळी भेट पोहचविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.