55 ex-Cong corporators Join BJP: चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का! नांदेडच्या ५५ माजी नगरसेवकांनी सोडली साथ

55 ex-Cong corporators from Nanded join BJP: पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त करत खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
55 ex-Cong corporators Join BJP
55 ex-Cong corporators Join BJPEsakal
Updated on

नांदेड - वाघाळा महापालिकेतील कॉँग्रेसच्या मागील वेळेस निवडून आलेल्या ५५ निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी शनिवारी (ता. २४) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे माजी आमदार अमर राजूरकर व इतरांनी स्वागत केले. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी सभापतींचा समावेश आहे. याचा मोठा फटका येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

माजी आमदार अमर राजूरकर यांनी याबाबत माहिती दिली. खासदार अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महापालिकेच्या ५२ माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. श्री. चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक माजी नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच काही माजी नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ५५ माजी नगरसेवकांनी खासदार चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

55 ex-Cong corporators Join BJP
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं 10 टक्के आरक्षण दिलं - एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन आतापर्यंत निवडून आलेले व स्विकृत मिळून एकूण ५५ माजी नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत. दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचे स्वागत व अभिनंदन केले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे श्री. चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

55 ex-Cong corporators Join BJP
Natya Parishad : नाट्यसंस्कृतीला बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करणार; CM शिंदेंची घोषणा

नांदेड - वाघाळा महापालिकेच्या मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आले होते. शनिवारी ५५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काळात त्यातील आणखी काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेकजण खासदार श्री. चव्हाण आणि भाजपसोबत येण्यास इच्छुक आहेत असं माजी आमदार अमर राजूरकर यांनी म्हटलं आहे.

55 ex-Cong corporators Join BJP
Who is Ajay Baraskar: कोण आहे अजय बारसकर?दीपाली सय्यद विरोधात लढवलेली 'ही' लोकसभा, डिपॉजिट झालं होतं जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.