अर्धापूर ( जिल्हा नांदेड) : शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो. आपल्या काळ्या आईची सेवा करित कष्टाने आन्नधान्न पिकवतो. अशाच अर्धापुरातील शेतकरी कुटंबातील तरुणांनी नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. शेतकरी पित्याने कष्ट करुन आपल्या मुलांना वैद्यकीय शिक्षण देवून शेती उत्पन्न सोबत डाॅक्टरही घडवले आहेत. शहरातील डाढाळे कुटूंबात तीन डाॅक्टर , एक औषध निर्माणशास्त्रातील पदवीत्तर पदवी प्राप्त केली आहे. तर राऊत यांच्या कुटुंबात दोन डाॅक्टर व एक औषध निर्माण शास्त्रतिल पदवीका प्राप्त केली आहे. शेतकरी पित्याचे कष्ट व मुलांच्या जिद्दीने यश मिळाले आहे. या दोन्ही कुटूंबाचे कौतुक होत असून एक आदर्श निर्माण केआ आहे.
शेतीचे आरोग्य ज्याला चांगले कळते तोच शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करु शकतो. तसेच मानवी आरोग्याची नाडी हाती लागली की रोग्याचा आजार कमी होण्यास वेळ लागत नाही. मानवाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी डाॅक्टर व शेतकरी यांचे सारखेच महत्त्व आसल्यामुळे एक जुलै हा कृषी व डाॅक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या दीड वर्षेच्या कोरोनाच्या काळात शेतकरी आणि डाॅक्टर किती महत्वाचे आहेत हे सा-या जगाने पाहिले आहे.
हेही वाचा - डॉक्टरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटण्याचे प्रमुख कारण लसीकरण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे
शेतकरी कुटुंबातही शैक्षणिक जागृती निर्माण झाली आहे. आपली पाल्यांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न प्रत्येक पालकांना आसते. ते साकार करण्यासाठी रात्र॔दिन कष्ट करण्याची तयारी असते. असेच स्वप्न अर्धापूर शहरातील डाढाळे कुटूंबाने पाहिजे. या कुटुंबाचा शेती हाच व्यवसाय. या कुटूंबातील कै अरविंदराव डाढाळे यांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी कष्ट ही केले. त्यांना तिन आपत्य. दोन मुलं व एक मुलगी. असे छोटे कुटुंब. मोठा मुलगा एमबीबीएस डीजीओ झाला असून सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुलगा व मुलगी असा भेद न करता मुलीला हि उच्च शिक्षण दिले. त्यांची मुलगी माधुरी ही एमबीबीएस डीजीओ झाली आहे. तर छोटा मुलगा शिवराज हा औषध निर्माण शास्त्रातील पदवीत्तर पदवी प्राप्त केली आहे. तर याच कुटुंबातील प्रल्हाद डाढाळे यांची मुलगी बीएमएमएस होत आहे.
शहरातील संभाजी राऊत हे अल्पभुधारक शेतकरी. शेती हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. त्यांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट केले. या कष्टाला यशाचे फळ येण्यासाठी पाल्यांनीही तेव्हढीच मेहनत केली. त्यांच्या तिन्ही पाल्यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील जिल्हा प्राथमिक शाळेत झाले आहे. त्यांचा मोठा मुलगा अनिकेत हा एमबीबीएस झाला असून तो एमडी ची तयारी करित आहे. तर दुसरा मुलगा डीफार्मसी झाला आहे. तर मुलगी संजीवनी हीचा गेल्या वर्षी एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे.
येथे क्लिक करा - 1 जुलैपासून घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे
या दोन्ही शेतकरी कुटुंबातील तरुणांनी आपल्या शेतकरी वडिलांच्या कष्टाचे चिज केले आहे. जो विश्वास पालकांनी टाकला तो विश्वास सार्थ करण्यासाठी या तरुणांनी अपार कष्ट करुन जिद्दीने यश संपादन केले आहे. शहरातील नव्या पिढीतील डाॅक्टर आहेत. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही या तरुणांनी व शेतकरी पित्याने कृतीतून दाखवून एक अदर्श निर्माण केला आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.