Ahilyabai Holkar Jayanti: पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय घेतले अन् अहिल्यादेवी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली

अहिलेशी विचारतात तुला काय काय करता येते, ती चिमुकली म्हणते, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, तिर कमठा मारणे वैगरे शिक्षण मी घेत असते.
Ahilyabai Holkar Jayanti: पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय घेतले अन् अहिल्यादेवी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली
Updated on

नांदेड : ता. ३१ मे १७२५ रोजी चौंडी ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर (पुर्वी बीड) येथे सुशिलाबाई मानकोजी शिंदे पाटील यांच्या घरी अहिल्याबाईचा जन्म झाला. तिला महादजी, शहाजी (येसाजी), बाणाजी, विठोजी, सुभानजी असे पाच भाऊ होते. तिचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी गावचे मैंदाड पाटील यांचे घर होते. ती आठ वर्षाची असताना घोड्यावर बसून शेताला जाताना वाटेत राजे मल्हारराव होळकर व बाजीराव पेशवे यांची भेट झाली.

मल्हाररावानी अहिल्येला पिण्यासाठी पाणी मागितले. तिने पाणी पिण्यासाठी शेतात विहिरीवर नेले. नरबा नौकराला हाक मारुन पाणी भाकरी आणायला सांगितले.

राजे मल्हारराव पाणी पिण्यासाठी जात असताना अहिल्या म्हणते, " पाणी पिण्या अगोदर दोन घास खाऊ घालणे आमचा धर्म आहे." नरबाने पाणी आणि भाजी भाकर त्यांना देतो. राजे मल्हारराव व पेशवे बाजीराव जेवण करुन पाणी पितात. अहिलेशी विचारतात तुला काय काय करता येते, ती चिमुकली म्हणते, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, तिर कमठा मारणे वैगरे शिक्षण मी घेत असते. राजे म्हणतात बाळ त्या झाडावरील पाखराला तिर मारुन दाखव, ती म्हणते मी तीर मारते पण " त्या पाखराला का मारु, त्याने आपले काय बिघडविले आहे," म्हणून त्यांचे जीव घेवू. हे बोलणे ऐकून व आतापर्यंतचे वागणे व चतूरपणा पाहुन राजे मल्हारराव अहिल्येवर खुष होतात, आणि तीला आपले पुत्र खंडेराव यांना करण्याची खुनगाठ बांधून, संध्याकाळी चौंडी गावात जातात. त्या वेळीं महादेव मंदिरात आरती चालू होती, अहिल्या आईच्या कुशीत बसलेली होती. आरती संपल्यानंतर राजे मल्हारराव व पेशवे बाजीराव माणकोजी पाटलांची भेट घेवून अहिल्येचे खंडेराव बरोबर लग्न जमविले. सन १७३३ ला पुण्यात लग्न पार पडले व अहिल्याईने राजे मल्हारावची सुन व राजकुमार खंडेरावची पत्नी म्हणून इंदौर राजदरबारात प्रवेश केली. इंदौर राजदरबारात सासू राणी गौतमाबाई, बनिबाई, व्दारकाबाई, हरकुबाई तसेच अहिल्याईचे नंदा उदाबाई, सीताबाई यांनी अहिल्याईचे स्वागत केले.

हेही वाचा - Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात!

आता अहिल्याईचे शिक्षण राणी गौतमाबाई व राजे मल्हारराव यांच्या देखरेखीखाली सुरु झाले. माळव्यात इंदौर येथे नुकतेच होळकरांनी स्वबळावर मराठी राज्याची स्थापना केली होती. राज्यकारभार राणी गौतमाबाई पाहाण्यास पहात होती. कारण राजे मल्हारराव यांना सतत मराठी साम्राज्याच्या विस्तारासाठी मोहिमेवर राज्या बाहेरच राहावे लागत होते. अहिल्याई राजदरबारात आल्यानंतर योगायोग राज्याचा विस्तार उत्तरेकडे वाढत होता. तसेच राज्यकारभाराचा भार ही वाढत होता. राणी गौतमाबाईने सुन अहिल्याईना राज्यकारभार सांभाळण्यासाठी सोबत घेतले. अधून- मधून पती राजकुमार खंडेराव बरोबर व राजे मल्हारराव बरोबर मोहिमेवर जाण्याचा योग अहिल्याईला येवू लागला. राज्यकारभाराबरोबरच सैनिकी व युध्दाचे प्रशिक्षण सुरु घेता येवू लागले. राजे मल्हारराव मोहिमेवरुन इंदौरला आल्यावर सुन अहिल्येला व राणी गौतमाबाईला बैठकीत बोलावून घेवून मोहिमेतील घडलेल्या घटना व शूराच्या कथा सांगत असत. राणी गौतमाबाई व अहिल्या मन लावून ऐकत असत. राजे मल्हारराव राज्यकारभारचा हिशोब अहिल्याईला विचारीत, व समजाऊन सांगित असतं. त्यामुळे अहिल्याई युध्दकलेत व राज्यकारभार साभांळण्यात सक्षम झाली.

Ahilyabai Holkar Jayanti: पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय घेतले अन् अहिल्यादेवी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

सन १७४० पासुन अहिल्याईने राज्यकारभारात लक्ष घालू लागली. मोहिमेवर राजकुमार खंडेराव होळकर बरोबर जाऊ लागली. अहिल्येला ता. दोन जानेवारी १७४५ ला भालेराव पुत्ररत्न व १४ डिसेंबर १७४८ ला मुक्ताई कन्यारत्न झाले. आता अहिल्येवर मुलांच्या संगोपनाची जिम्मेदारी वाढली होती. अहिल्याईना मुलांना वाढविणे, मोहिमेवर जाणे, राज्यकारभारात हिशोब ठेवणे, राजदरबारात बसून लोकांचे अनेक प्रश्न सोडवणे, ही सर्व कामे नियमित व वेळेवर पार पाडावी लागत होती.

सन १७५४ ला अहिल्याईना पति राजकुमार खंडेराव बरोबर उत्तरेच्या मोहिमेत जाण्याचा योग आला. उतरेचे मोहिमेतील दिल्लीची कामे आटोपली की राजस्थानात जाटाना वठणीवर आणण्यासाठी कुंभेरीच्या किल्ल्यावर स्वारी करण्याची पुर्ण जिम्मेदारी राजकुमार खंडेरावावर सोपवण्यात आली होती. राजकुमार खंडेराव ने २० जानेवारी १७५४ ला कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा देवून कुशलतेने युध्दाला सुरुवात केली. सरदार राघोबादादा भट व शिंदे यांचे सहकार्य वेळेवर न मिळाल्याने हा लढा दोन महिने चालला हा लढा एकट्याच खंडेरावच्या नेतृत्त्वाखाली यशस्वीपणे लढत होते. परंतू दुष्मणाला पहावले नाही, ज्यांना मल्हारराव यांचे वर्चस्व पाहवत नव्हते त्यांनी राजे मल्हारराव यांचे खचिकरण करण्यासाठी ता. १७ मार्च १७५४ रोजी राजकुमार युध्दाच नेतृत्व करित असताना नेमकं खंडेराव यांना शत्रुच्या गोळीने टिपले आणि रणांगनात खंडेराव यांना विरगती प्राप्त झाली.

इंदौरच्या मराठी साम्राज्याचा एकुलता एक वारसदार खंडेराव गेल्याने राजे मल्हाररावाना दु:खाचा डोंगर कोसळला, कर्तृत्ववान अहिल्याईला परंपरेनुसार सती जाण्याची वेळ आली. त्याप्रमाणे तयारी सुरु झाली, राजे मल्हारराव शत्रूचा डाव ओळखिले आणि अहिल्येला सती जाण्यापासून रोखवायचे ठरविले.त्यानी दु:ख विसरुन ताबडतोब अहिल्येकडे गेले व म्हणाले," हे विरांगणे तू जिवंत राहिली तर खंडेराव जिवंत आहे असे मी समजतो, तुला पुढील जनकल्याणासाठी जिवंत राहाणे गरजेचं आहे."

ही हाक ऐकून अहिल्याई विचारात पडली. ती सर्व वेद, पुराण, इतिहास वाचन, श्रवण केली होती. त्यात कोठेही सती जाणे व सती जाण्याने पाप, किंवा पुण्य होते असे कोठेही नव्हते. हे तर स्त्रियासाठी फसवेगीरी होती. आत्महत्या करणे पाप असून लोककल्याण करणे पुण्य आहे आणि माझे सासरे मला पुण्य करण्याची संधी देत आहेत, ती संधी का नाकारु असे तिच्या मनात विचार आले आणि लगेच सासरे राजे मल्हारराव यांना म्हणाली, " मामाजी दु: ख आवरा, आपल्या म्हणण्याप्रमाणे सती जाणार नाही. सती जाऊन मोक्ष मिळविण्यापेक्षा जिवंत राहुन लाखो जनतेला सुख मिळवून देण्यासाठीचं उरलेलं आयुष्य खर्ची घालिन. राजाने जनतेला सुख समाधान मिळवून देणे हाच खरा राजधर्म आहे तो मी पार पाडणार." एवढे बोलून सतीचे कपडे काढून टाकली‌ व सासरे राजे मल्हारराव यांचे चरण शिवून प्रजेला हात जोडून क्षमा मागितली. त्यानंतर पुढील रणशूर राजकुमाराचे अंत्यविधीचे पुढील प्रक्रिया करण्यात आल्या.

त्या काळात पेशव्याई ही मनुस्मृतीनुसार चालत होती. बहुजन समाज अज्ञान, अंध्दश्रध्दा व परंपरेत किचपडत पडलेला होता. त्याकाळी शुद्र माणसाला कसलेच अधिकार नव्हते. त्या काळात सर्व समाजाच्या स्त्रियांना हिन दर्जा मिळत होता. राजे मल्हारराव यांनी वैदिक धर्माच्या विरोधात धडाडी ‌निर्णय घेवून स्रिला सन्मान मिळवून देवून राजकारणात आणले होते. त्यामुळे पहिला महापुरुष म्हणून राजे मल्हाररावांचा उल्लेख ‌होतो.

येथे क्लिक करा - कळमनुरी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश डी. एस. पारवानी यांचा येथील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे बदली झाली

त्यामुळेच परंपरेच्या श्रखंला तोडून धैर्याने पुढे येवून पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय अहिल्येने घेतली आणि आदर्श राज्य करणारी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली. १७ मार्च १७५४ ला राजकुमार खंडेरावाचां मराठी साम्राज्य रक्षणार्थ रणांगनात विरगती प्राप्ती झाली. लोकमाता परंपरा तोडून सती न जाता लोककल्याणकारी कामे करण्यासाठी जिवंत राहिली. राजे मल्हारराव व्यवस्थेच्या विरोधात जाऊन एका विधवा स्री अहिल्याईला राज्यकारभारात आणले. अहिल्येला राज्यकारभाराच्या प्रशिक्षणासाठी राज्याच्या प्रधान राणी गौतमाबाईकडे सोपविले. अहिल्येला मोहिमेचे प्रशिक्षण देवून खंडेरावाची जागा भरुन काढली व अहिल्याईला पुढील मराठी साम्राज्याच्या कार्याला लावले.

राजे मल्हाररावाना सतत मराठी साम्राज्य विस्तारासाठी राज्यात व राज्याबाहेर दौऱ्यावर जावे लागत होते, साम्राज्याचा विस्तार वाढतच होता. त्यामुळे अहिल्याईना राज्यकारभार सांभाळण्यासाठी राणी गौतमाबाईला मदत करणे व पुत्र मालेराव, कन्या मुक्ताई त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांच्या राजकीय प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, नियमितपणे राज दरबारातील पत्रव्यवहार, तक्रारी यांचे निपटारा करणे ही जबाबदारी लोकमाता अहिल्याईवर येवून पडली होती.

आक्टोंबर १७५९ ला राजे मल्हारराव सर्व कुटुंब कपीला घेवून मोहीमेवर गेले होते. त्यात राजकुमार मालेराव, अहिल्याई सोबत होते. राजपुतान्यातील खंडणी वसुल करुन, दिल्ली गाठली. राजे मल्हारराव दिल्ली जाईपर्यंत दत्ताजी शिंदेचा रणागंनात मृत्यू झाला. भाऊ जनकोजी घायाळ झाले होते. दत्ताजी शिंदेची पत्नी भगीरथीबाईचा नववा महिना चालू होता. राजे मल्हारराव यांनी भागीरथीबाईची जबाबदारी लोकमाता अहिल्येवर टाकून उज्जैनला पाठवून दिले व मालेरावना सोबत घेवून मोहिमेसाठी थांबले.

अहिल्याई या सर्वांना घेवून उज्जैनला निघाली. वाटेतच कुवारी नदीवर मुकाम पडला. कै. दत्ताजी शिंदे यांच्या तेरवीचा कार्यक्रम येथेच उरकून घेतला. याच मुक्कामात भगीरथीबाईना पुत्ररत्न झाले. त्यांना घेवून अहिल्याईने सुखरुप उज्जैनला पोहचवूनच इंदौर राजधानीत परत आले.

ता. २१ सप्टेंबर १७६१ ला सासू व मार्गदर्शिका राणी गोतमाबाईचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. राजे मल्हारराव यांनी राज्यकारभार सांभाळण्यासाठी प्रधान पदांची सर्व जिम्मेदारी लोकमाता अहिल्याईवर सोपविली. राज्यकारभारातील सल्लागार म्हणून राणी हरकुमावशी, बंधू महादजी शिंदे, भारमलदादा होळकर यांना राजदरबारात ठेवण्यात आलं. याच काळात नानासाहेब पेशवे ता. ता. २३ जून रोजी आणि ता. १० डिसेंबर १७६१ रोजी राणी ताराबाईचा मृत्यु झाला होता. थोरले माधवराव यांना सातार्याचे प्रधान (पेशवे) पदी नियुक्ती झाली होती.

इंदौर राज्याच्या राज्यकारभाराची सूत्रे अहिल्याईने हाती घेतली व राज्यकारभार पाहाण्यास सुरुवात केली. दररोज राजदरबारात बसून लोकांची प्रश्न सोडवू लागली. सर्व लेखाजोखा पाहू लागली. प्रजा अहिल्याईच्या कामावर खूष होती. ती आता लोकांची माताच झाली होती. सर्वासाठी राजदरबार खुल्ला होता,स्रि-पुरुष प्रत्यक्ष लोकमातेकडे तक्रार घेवून येण्यास परवानगी होती. लोकमाता निःपक्ष पणे न्याय देत होती.

सन १७६४-६५ या काळात राजे‌ मल्हारराव महाराज उतरेच्या मोहिमेवर असताना इंग्रज डोकें वर काढीत होता. त्यांच्याशी मुकाबला ‌करण्यासाठी आधूनिक शस्त्रास्त्रांची गरज होती. महाराजानी तोफेचा कारखाना ग्वाल्हेर येथे काढण्याची जबाबदारी लोकमाता अहिल्याईवर दिली. लोकमातेने ही जिमेदारी पार पाडली, आणि शस्त्र- अस्त्र युध्द सामुग्री ग्वाल्हेरहून उत्तरेतील मोहिमेवर पुरविली. फेब्रुवारी १७६५ मध्ये ग्वाल्हेरचे तोफेचा कारखाना सांभाळीत असताना गोहदच्या जाटाचें उपद्रव होते. त्यांच्यावर स्वतः अहिल्याईने हल्ला करुन किल्ले आपल्या ताब्यात घेतले. ही बातमी राजे मल्हारराव यांना समजताच त्यांच्या तोंडून उद्गार निघाले माझा खंडेराव जिवंत आहे. अशाप्रकारे राजे मल्हाररावाच्या तालमित लोकमाता अहिल्याई तयार झाली होती. रा‌ज्यकारभार व युध्दाच्या मोहिमा सांभाळणे ही पेशवाई काळातील आश्र्चर्यचकित गोष्ट होती. राजे मल्हारराव उतरेच्या मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी युध्द चालू असताना कानाच्या वेदना वाढल्या आणि आलमपूर येथे वयाच्या ७३ व्या वर्षी सम्राट राजे मल्हारराव यांचा मृत्यू झाला.

हे उघडून तर पहा - नामकरणाचं शिवसेनेला जे जमलं नाही ते मनसेने केलं....

लोकमाता अहिल्याईने ता. ३ जुन १७६६ रोजी राजकुमार मालेराव पुत्र यांना इंदौरच्या गादीवर बसविला. तो पराक्रमी व चतुर योध्दा होता. परंतू राजदरबारात फुकटखाऊ, खुष मष्करी करणाऱ्यांची संख्या वाढलेली होती. सत्ता हातात येताच राजदरबारातील पुरोहितावर बंधने घातली. तशी तक्रार लोकमातेच्या कानावर पुरोहितांनी घातली, लोकमाता मालेराव यांना समजावले व मालेरावानी थोडी नरमाई घेतली, येथेच धोका झाला. आज लोकमातेमुळे निभावत आहे. उद्या मालेराव आपल्यासाठी कर्दनकाळ ठरु शकतो. ही गोष्ट राजदरबातील ब्राह्मण मंडळीला खटकत होती. त्यांना दिवाणजी गंगोबातात्याची फुस होती, त्यांचा इंदौर राजावर डोळा होता. त्यानी मालेरावाची बदनामी सुरु केली आणि तशा घटना घडवून आणले बिमारपणात चुकीचे औषधे देण्यात आल्यामुळे १७ मार्च १७६७ रोजी आजारात झटके येवून राजे मालेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरोहितांनी लोकमातेनेच स्वतःच्या मुलाला हात्तीच्या पायाला देवून‌ मारले अशी बदनामी सुरु केली. तसे लिखाणही करुन ठेवले. पुढे इंग्रज माल्कनने त्या बाबत शोध घेतले असता लोकमातेने मुलाला मारले हे धांदात खोटे आहे याची खात्री करून घेतली. तरी त्या पुरोहित इतिहासकारानी लिहिलेले चरित्र पुस्तक वाचून लोकमातेच बदनामी करणे चालूच आहे.

म्हणून " सत्यशोधा आणि सत्य स्विकारा " पुरोहितांचे ग्रंथ धिक्कारा,यातच खरा पुरुषार्थ आहे.

सम्राट राजे मल्हाररावानंतर मालेराव इंदौरचे राजे झाले. पंरतू त्यांना पराक्रम दाखवण्यापुर्वीच दुर्देव आड आले आणि वर्षाच्या आतच मृत्यू झाला. लोकमाता अहिल्याईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पुर्वी‌ ठरल्याप्रमाणे या संधीचा फायदा घेवून दिवाणजी गंगोबातात्या चंद्रचूड स्वतः चा मुलगा द्त्तक देवून इंदौर राज्य हडप करण्याची तयारी केली होती. पेशव्या सरदार राघोबादादा भट यांना दलाली देवून सहकार्य घेण्याचे ठरविले. गंगोबातात्या सन १७३४ पासून राजे मल्हाररावाचें दिवाणजी होते. त्यांना इंदौर राज्यातील खाणा- खुणा माहीत होत्या. त्या नियोजनानुसार गंगोबातात्या मोठ्या दिमाखात दुःखात सापडलेल्या अहिल्याईकडे गेले व प्रस्ताव मांडला. लोकमाते आता दु:खात राहून कसं चालणार, शत्रू उठून बसले आहेत, आता तुम्ही माझ्या मुलाला दत्तक घेवून इंदौरच्या गादीवर बसवा आणि आपण मन शांतीसाठी तीर्थयात्रेला जा. मी आपल्याला काही कमी पडून देणार नाही. लोकमाता शांतपणे ऐकून घेतले व जोर जोरात म्हणाली, दिवाणजी तोंड सांभाळून बोला, तुम्ही ब्राह्मण होळकराचे नौकर आहात, आमच्यावर दु:खाच डोंगर कोसळले असताना, सहकार्य करण्याऐवजी हरामखोरीला उठलात, हे कदापी सहन करणार नाही, ही दौलत राजे मल्हारावानी रक्त सांडून कमावलेलं असून मी एका राजाची सून आणि एका राजाची आई आहे. ह्या दौलतीसाठी माझे पती रणागंनावर लढता लढता हुत्तात्मे झाले त्यांची पत्नी आहे. या दौलतीची वारसदार मी आहे, त्याबाबतीत काय ते निर्णय घेयाचा तो आम्ही घेऊ, आपण त्यात लुडबुड करु नये.

गंगोबा तात्या खाली मान घालून निघून गेले. गंगोबातात्या चिडीला पेटले होते. त्यांनी थेट राघोबादादा भट यांची भेट घेतली व इंदौरवर हल्ला करून राज्य बळकावण्याची निती ठरली. राघोबादादा भट पन्नासहजार सैन्यासह क्षिप्रा नदीकाठी हजर झाले. ही वार्ता लोकमाता अहिल्याईच्या कानावर येताच, तिची मर्दागनी जागी झाली. लोकमातेने सर्व मराठी सरदारांना पत्र पाठवून‌ बोलावून घेतले. सरदार‌ शरिफभाई यांना महिला सेना तयार करण्याचे आदेश‌ दिले.

लोकमातेने युध्दाची तयारी केली आणि विचार केला दोन्ही बाजूंनी नुकसान मराठी सैन्याचच होणार आहे. ते टाळण्यासाठी लोकमानेने राघोबादादाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात म्हणाली," राघोबा पेशवे मी तुमच्याशी लढण्यास तयार असून महिलाचे सैन्य घेऊन लढण्यास रणांगणावर येत आहे. मी हरले तरी मी बाईचं आहे, परंतू आपण हारलात तर तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहाणार नाहीं. हे विचार करुनच पुढे पाऊल टाका.

हे पत्र पाहूनच राघोबा भट घाबरले आणि लोकमातेला पत्र पाठवले मी सांत्वनासाठी येत आहे, गैरसमज करुन घेवू नये, मी माझी फौज दक्षिणेला पाठवून मी तुम्हाला भेटायला येत आहे. राघोबादादानी लोकमाता अहिल्याईना झाल्या चुकाबद्दलची माफी मागितली. लोकमातेने उदार अंतकरणाने क्षमा करून , त्यांचा सन्मान करून पाठवून दिले. शत्रुचाही सन्मान करून मित्रत्व जोडणे हे महान गुणधर्म लोकमाता अहिल्याईत होते. त्यानी इंदौरचे गादी स्वतः कडे ठेवून सुभेदार पद तुकोजीराव होळकर यांच्याकडे दिले व राज्यकारभार पहाण्यास सुरुवात केली.

सुभेदार तुकोजीराव होळकर हे नेहमी उतरेच्या व दक्षिणेच्या मोहिमेवर असतं. अशा वेळी राजपुताण्यात रजपुत राजे अधूनमधून उठाव करीत असतं. सन १७७१, १७८२, १७८३, व १७८७ ला महाराणी अहिल्याईना रजपुत राजाबरोबर लढण्याचा योग आला, त्यांनी सैन्याच नेतृत्व केलं. राजस्थानचे‌ चंद्रवंत राजे हरामीला येत असतं. त्यांची खोड मोडण्यासाठी त्यावेळी महाराणी स्वतः त्या लढाईच नेतृत्व केले होते. सन १७८७ ला महाराणी सरदार शरिफभाई यांना घेऊन रामपुरावर स्वारी केली व रामपुरा ताब्यात घेतला. रजपुत सरदार सौभाग्यसिंह होळकर सैन्याच्या हातात सापडला असताना तो महाराणीला शरण येवून जीवदान मागितले होते. महाराणी त्याला जीवदान देवून सोडून दिले. त्या सौभाग्यसिंहने दुसऱ्या दिवशी सैन्य गोळा करुन पुन्हा होळकर सैन्यावर हल्ला केला. या वेळी मात्र महाराणीने कठोर निर्णय घेवून त्याला मारण्याचे आदेश दिले आणि सौभाग्यसिंह यांना पकडून तोफेच्या तोंडेला दिले. रामपुरा येथे रजपुत सैन्याचा दारुन पराभव झाला. ही बातमी इंदौर व पुणे येथे समजल्यावर पेशव्यांच्या बाराभाईचे कारभारी नाना फडणवीस यांनी चारी दिसेला तोफा उडवून विजय साजरा केले व महाराणीचे कौतूकही करण्यात आले.

त्या काळात एक स्त्रि राज्यकारभारच सांभाळत नाही तर युध्दाही करते हे जगाला दाखवून दिले होते. महाराणी अहिल्याईने राज्यकारभार हातात घेतल्यावर पुर्ण भारतात लोककल्याणकारी कामे करण्याचे ठरविले व करूनही दाखविले. देशात सामान्य भाविक भक्त तिर्थ यात्रेला जातात तेथे त्याना‌ कसलीही सुविधा नव्हती, पाणी सुध्दा पिण्याची व्यवस्था नव्हती. त्याला शुद्र म्हणून हिनवल जात असे, तहान लागली तर वरून पाणी वाढीत होते. थाबंण्याची व्यवस्था नव्हती, जेवण्याची व्यवस्था नव्हती, बसायला सावली नव्हती, मंदिरात कोरडा शिधा व पैसा घेणारे ब्राह्मण पुजारी पण कसलीही सुविधा न देता सामान्यांना लुटण्यासाठी बसलेले असतं. ते स्वतः ला भुदेव समजून घेत असतं. हे दृष्य महाराणी मोहिमेवर असताना प्रत्येक्ष पाहिले होते. अशा तिर्थाच्या ठिकाणी मंदिर पुर्विच होते, कांही ठिकाणी पडझड झाली असेल, अशा देशातील साडेतीन हजार सार्वजनिक व तिर्थाच्या ठिकाणी महाराणी अहिल्याईने स्वःताच्या खाजगी मालमत्तेतून लोक कल्याणकारी सुविधा देण्याचे ठरविले आणि प्रत्येक तिर्थाच्या ठिकाणी राहाण्यासाठी धर्मशाळा, पिण्याच्या‌ पाण्यासाठी विहीरी, तलाव, हिमालयात गरम पाण्याचे कुंड, दळण वळणासाठी रस्ते, पर्यावरण व सावलीसाठी वृक्षारोपण, कार्यक्रमासाठी सभागृह, बायका पोर, प्रवासी यांचे अपघात टाळण्यासाठी नदीच्या काठावर घाट बांधले आणि भुकेलेल्या लोकांसाठी अन्न छत्रे सुरू केली होती.

लोकांच्या सोईसाठी पत्र व्यवहारासाठी टपाल व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी-बी भरणाची व दुष्काळ निवारण व्यवस्था, व्यापाऱ्यांसाठी सुविधा, कामगारांसाठी उद्दोग धंदे, कलाकारांना राजाश्रय दिला, स्रि-पुरूष भेदभाव मिटवण्यासाठी महिलांना समानतेचे हक्क , व महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी स्त्रियांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्था, स्रि-पुरूषाना वाचन कक्ष, वाचन व श्रवणासाठी ग्रंथालयाची व्यवस्था केली. स्रिला जगण्याचा आधार देण्यासाठी विधवा स्रिला दत्तक घेण्याचे व संपती सांभाळण्याचे अधिकार दिले. असेच अधिकार सर्व शुद्र नर- नारीना देण्यात आले होते. असे अनेक लोककल्याणकारी कामे लोकमाता महाराणीने केले होते. तिच्या राज्यात भेदभाव नव्हता सर्वांना समान न्याय मिळत होता. तिने मंदिरे बांधली नसून मंदिराच्या परिसरात लोक कल्याणासाठी कामे केली आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. ती हिंदू मुस्लीम भेदभाव मानला नाही व अन्य कोणताही व कसलाही भेदभाव केलेली नाही. असा भेदभाव केला असता तर सैन्यात मुस्लिम फौज व मुस्लिम राज्यात ही लोककल्याणकारी व्यवस्था करू शकली नसती. मुस्लिम राजे तिचा सल्ला घेत होते, तिचा सन्मान करत होते. इंदौरच्या महाराणीने संपुर्ण भारतात ह्या सुविधा देवून भारतातील मराठी साम्राज्याची सम्राज्ञी बनली होती. या देशातील भुदेव मात्र स्वहितासाठी जातीभेद, धर्मभेद करत असतात आणि चुकीचा इतिहास लिहित असतात. हे जरा समजून घेण्याची गरज आहे.

भुदेवानी छ. शिवाजीला राजा मानल नाही. छ. मल्हाररावाना राजा मानल नाही. अहिल्याईना महाराणी मानल नाही. तिचा मुलागा मृत्यू पावला त्यावेळेस बदनाम करून राज्य घालून घेण्यासाठी मुस्लिम आले नव्हतेतर भुदेवच आले होते. उलट शरिफभाई ईमान पुर्वक पाठीशी उभे होते. अलिकडच्या काळात राजकारणासाठी चूकीचा इतिहास लिहून सामान्य माणसाच्या डोळ्यात धूळफेक करित आहेत .हे आपण समजून घेण्याची व लोकमाता महाराणी अहिल्याईची बदनामी रोखणे काळाची गरज आहे. महापुरुष कोण्या जाती धर्माचे नसतात हे समाज बांधवांनी समजून‌ घेण्याची गरज आहे. अशा प्रजावत्सल लोकमाता महाराणी यांचा ता. १३ आगष्ट १७९५ रोजी मृत्यू झाला. त्या मातेचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ३१ मे ला तिच्या जयंती निमित्त घरोघरी सत्यशोधक पिवळा झेंडा लावून "अभिवादन "करा.

लेखक - गोविंदराव शूरनर, राष्ट्रिय सत्यशोधक समाज संघ, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()