Nanded News : अमरनाथ यात्री संघ, भाजप, लायन्सतर्फे रविवारी (ता.३०) १४ किलोमीटर पाऊस दिंडी काढून रत्नेश्वरी गडावर विविध प्रकारच्या वृक्षांचे बीजारोपण करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात या गडावर नंदनवन फुलणार आहे. यात्री संघाचा हा २३ वा उपक्रम आहे.
२३ वी अमरनाथ यात्रा ५ जुलैला व २४ वी अमरनाथ यात्रा १९ जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने ३ महिन्यांपासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात.
यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस दिंडीत करण्यात येते. तसेच, या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे शहरातील बालाजी मंदिर हनुमान टेकडी येथून रविवारी सकाळी सहा वाजता पाऊस दिंडीस वाजतगाजत सुरवात झाली.
रस्त्यात जागोजागी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, पवन गुरुखुदे, कैलास महाराज वैष्णव, गणेश झोळगे, स्वच्छतादूत माधवराव झरीकर, विश्वेश्वर महादेव मंदिर नवीन सिडको यांच्यातर्फे चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली. यात्रेकरूंनी सोबत आणलेल्या सीताफळ, जांभूळ, कडूलिंब यासह आंब्याच्या कोयींची रत्नेश्वरीच्या गडावर लागवड केली.
त्यानंतर रत्नेश्वरी देवस्थान व अन्नपूर्णा माता देवस्थानतर्फे अमरनाथ यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहभागी यात्रेकरूंनी देवीचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर समारोप करण्यात आला.
मराठवाड्यात पुरेसा पाऊस नसून बळिराजा त्रस्त असल्यामुळे माता रत्नेश्वरीला यावेळी पावसासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या घरी जमा असलेल्या बिया, कोयी सोबत आणल्या होत्या. त्याचे यावेळी बीजारोपण करण्यात आले. याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप ठाकूर यांनी यावेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.