अंबाडी वन परिक्षेत्रातील जंगलाला भीषण आग

जागतिक वन दिनीच औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक
Ambadi forest fire World Forest Day burn birds along with medicinal plants nanded
Ambadi forest fire World Forest Day burn birds along with medicinal plants nandedsakal
Updated on

किनवट : जागतिक वन दिनीच सोमवारी (ता.२१) रोजी जंगलाला भीषण आग लागल्याची घटना तालुक्यातील अंबाडी वन क्षेत्रात घडली. मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगलक्षेत्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली. तालुक्यातील अंबाडी वन क्षेत्राला ही भीषण आग लागली आहे. धुमसणाऱ्या या आगीत अंबाडी जंगलातील वन औषधींसह पक्षीही जळून खाक झाले आहेत.

अभयारण्य असणाऱ्या किनवट-माहूर, इस्लापूर जंगल क्षेत्रात गेल्या महिन्याभरात पाच वेळा भीषण आग लागली आहे. तीन ते चार दिवस जंगलात आग धुमसत आहे. मोहफुले, तेंदूपत्ता, लाकडासाठी जंगल पेटवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच अंबाडी वन क्षेत्राला भीषण आग लागली. या जंगल क्षेत्रात वाघ, अस्वल, लांडगा, कोल्हे, नीलगाय, हरीण, काळवीट, बिबट्या असे अनेक वन्यजीव आहेत. आयुर्वेदिक वसनस्पती, तेंदूपत्ता, मध, डिंक, लाकूड, मोहफुले हा वन मेवाही या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो. या अनेक औषधी वनस्पतींची खान असणाऱ्या अभयारण्यात उन्हाळा सुरु होताच हा वणवा धगधगू लागल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()