रुग्णवाहिका, एसटी, मालवाहतुक करणाऱ्या चालकांचा गौरव

अर्धापूर (जि.नांदेड) - वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने चालकांचा चालक दिनाचे औचित्य साधून चालकांचा गौरव करण्यात आला.
अर्धापूर (जि.नांदेड) - वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने चालकांचा चालक दिनाचे औचित्य साधून चालकांचा गौरव करण्यात आला.
Updated on

अर्धापूर (जि.नांदेड) - राष्ट्राच्या विकासात दळणवळणाची साधने महत्त्वाची आहेत. प्रवाशी, माल, वस्तू निश्चित ठिकाणी व वेळेवर पोहोचून सेवा देण्याचे काम चालक करित असतात. राष्ट्राच्या विकासात चालकांचा मोठा वाटा आहे.चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाहने चालविणे (Nanded) आवश्यक आहे, असे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक अरूण केंद्रे यांनी शुक्रवारी (ता.१७) केले. वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने चालकांचा चालक दिनाचे औचित्य साधून चालकांचा गौरव करण्यात आला. देशातील सर्व प्रकारच्या वाहतुकीत चालक महत्त्वाची भूमिका बजावतात. मालवाहतुकदारांच्या मागणीवरून १७ सप्टेंबरला चालक दिन साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या रस्ता वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Ardhapur) दिल्या होत्या. या सुचनेनुसार वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने चालकदिन साजरा करण्यात आला.

अर्धापूर (जि.नांदेड) - वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने चालकांचा चालक दिनाचे औचित्य साधून चालकांचा गौरव करण्यात आला.
ज्याप्रमाणे निजामाशी लढलो, तसेच कोविडसोबत लढू - उद्धव ठाकरे

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवते, एस.एन.भोसले, छगन सांगोळे , चालक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूग्णवाहिका, बसचालक, मालवाहतूक करणारे आदी चालकांचा गौरव करण्यात आला. तसेच चालकांना फराळ, मास्क, सॅनिटायझर देवून गौरविण्यात आले. तसेच वाहतूकीचे नियम, हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगितले. या वेळी रमाकांत शिंदे, एस.आर.कदम. दत्तात्रय डुकरे, वसंत सिनगारे आदी चालकांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.