पनवेल, नंदीग्रामसह अमृतसर, रामेश्वर आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस पुन्हा सुरु

तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस शुक्रवारी (ता. दोन) जुलैपासून सुरु होणार आहे. या सोबतच जनशताब्दी एक्सप्रेस, निजामुद्दीन एक्सप्रेस, बंगलोर एक्सप्रेस, जम्मू तावी एक्सप्रेस, संत्रा गच्ची एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस इत्यादी महत्वाच्या रेल्वे गाड्या या पूर्वीच सुरु झाल्या आहेत..
रेल्वे सेवा सुरु
रेल्वे सेवा सुरु
Updated on

नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत जुलै महिन्यापासून सुरु होणार आहेत. यात नांदेड- पनवेल एक्सप्रेस, आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, रामेश्वरम एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस जुलै महिन्याच्या पहिल्यात आठवड्यात सुरु होणार आहेत. गुरुवारी (ता. एक जुलै) पासून नांदेड ते पनवेल एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत सुरु झाली आहे.

तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस शुक्रवारी (ता. दोन) जुलैपासून सुरु होणार आहे. या सोबतच जनशताब्दी एक्सप्रेस, निजामुद्दीन एक्सप्रेस, बंगलोर एक्सप्रेस, जम्मू तावी एक्सप्रेस, संत्रा गच्ची एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस इत्यादी महत्वाच्या रेल्वे गाड्या या पूर्वीच सुरु झाल्या आहेत..

हेही वाचा - गुन्हेगारांना मोक्का लावण्यास विशेष पोलिस महासंचालकांनी मान्यता दिली आहे, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

या गाड्या पुढील प्रमाणे सुरु होत आहेत :

गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल विशेष गाडी : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे

स्थानकावरून दिनांक १ जुलै पासून नियमित सुरु होत आहे.

गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी : हि गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून

ता. २ जुलै पासून नियमित सुरु होत आहे.

मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस: गाडी संख्या ०११४१ मुंबई

सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम.टी. येथून

ता. ०१ जुले , २०२१ पासून धावणार आहे.

आदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम विशेष :

गाडी संख्या ०११४२ आदिलाबाद ते मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस येथून ता. ०२ जुले, २०२१ पासून धावणार आहे.

गाडी संख्या ०४६९२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड ( सोमवारी ) : ही गाडी अमृतसर येथून

ता. ५ जुलै २०२१ रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि जालंधर, लुधियाना, न्यू दिल्ली, झांसी, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.४० वाजता पोहोचेल.

येथे क्लिक करा - सावद्याची कन्या झाली अब्जाधीश; तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा

गाडी संख्या ०४६९१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर (बुधवारी) :

ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर सात ०७ जुलै २०२१ पासून दुपारी ११.०५ वाजता सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.३० वाजता पोहोचेल.

गाड़ी संख्या ०१४०४ कोल्हापुर ते नागपुर विशेष एक्स्प्रेस ता. ०२ जुलैपासून कोल्हापुर ते नागपुर अशी धावणार आहे

गाड़ी संख्या ०१४०३ नागपुर ते कोल्हापुर विशेष एक्स्प्रेस ता. ०३ जुले पासून नागपुर ते कोल्हापुर अशी धावणार आहे.

गाडी संख्या ०६७३३ रामेश्वरम ते ओखा विशेष गाडी:

ही गाडी रामेश्वरम येथून ता. २ जुलै पासून दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होत आहे.

गाडी संख्या ०६७३४ ओखा ते रामेश्वरम विशेष गाडी:

ही गाडी ता. ०६ जुलै पासून ता. ९ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होत आहे.

गाडी संख्या ०८५६५ विशाखापट्टणम ते नांदेड विशेष गाडी (त्री -साप्ताहिक) : ही गाडी विशाखापट्टणम येथून दर मंगळवारी, बुधवारी आणि शनिवारी दिनांक १० जुलै पासून रात्री २०.०० वाजता सुटून राजमुंद्री, काझीपेत, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३४ वाजता पोहोचणार आहे.

गाडी संख्या ०८५६६ नांदेड ते विशाखापट्टणम विशेष गाडी (त्री -साप्ताहिक) :

ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी, गुरुवारी आणि रविवारी ता. ११ जुलैपासून दुपारी १६.३५ वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, काझीपेत मार्गे विशाखापट्टणम येथे दिवशी सकाळी ०९.१५ वाजता पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.