भोकर ( जिल्हा नांदेड ) : सूजलाम्- सुफलाम् महाराष्ट्रातील कलाकार हा रसिकांच्या शिरोपेचातील मानाचा तुरा आहे. लाॅकडाऊनमूळ आज कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर लाकडाऊन सोसलं आता पुन्हा तेच नशिबी आल्याने व्यवसायावर संक्रांत आली आहे. संसाराची पुरती धुळधाण झाली आहे. खायला चिमूटभर धान्य नाही. चिल्यापिल्यानां घास कसा भरवायचा. जगाव का मरावं असे अनेक प्रश्र्न भेडसावत आहे. लाकडाऊन तर कलाकारांच्या मुळावरच उतरल आहे अशी व्यथा हातबल झालेल्या कलावंतांनी "सकाळ "कडे मांडली आहे.
प्राचीन काळापासून संगीताची पायमूळ घट्ट रोवलेली आहेत. राजेरजवाड्यात संगीताचा मनसोक्त आनंद लुटला जात असे. कलाकारांना मानाचस्थान देऊन रसिक मायबाप आपली संगीताची भूक भागवित होते. कालातंराने विविध कला विकसित झाल्या तमाशा, लोकनाट्य, पोवाडा, शाहिरी, गणगवळण, वगनाट्य, नृत्यकला, भारुड, गोंधळी, गीत गायन, भजन, बैठकीची लावणी, सवालजबाब, संगीतबारी, आॅकेस्ट्रा, कलापथक अशा माध्यमातून कलाकार सादरीकरण करुन उपजिवीका भागवीत होते. कलेची अवीरत सेवा करताना अनेक अडचणींचा सामना कराला लागत होता. अशा खडतर प्रवासात तुसभरहि न डगमगता कलावंतांनी प्रबोधन करुन जनजागृती केली.
शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती कलेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवीली आहे. कलाकार हा महाराष्ट्राची आन, बान, शान आहे. लोककला दिवसेंदिवस लोप पावत असताना अशा बिकट परिस्थितीत कलेला संजीवनी देऊन महाराष्ट्रातील कलाकारांनी ती कला जिवंत ठेवली आहे. अस्सल जातीवंत कलाकारावर आजच्या परिस्थितीत उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे देशात लाकडाऊन जाहिर करण्यात आल्याने सर्व कारभार ठप्प झाले होते. दरम्यान कलावंतांनी कसंबसं तग धरुन संसारगाडा पूढे नेला. आता कूठे सूरळीतपणा येत असताना पुन्हा लाकडाऊन जाहिर करण्यात आल्याने कलेवर पोट असलेल्या कलाकाराच सारं अवसान गळून गेल आहे.
पुर्वी कलाकाराना रसिकानी डोक्यावर घेतल्याने त्याची "सुग्गी" होती. हळुहळु लोककलेची घसरण सूरु झाली. विज्ञानयुगात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसीत झाल्याने कलाकाराचा व्यवसाय अडचणीत आला. लाॅकडाऊनमुळे कलावंत ऊघड्यावर आले आहेत. शासकीय मानधनावर घर कस चालणार चार कलाकाराना मिळणार आर्थिक ऊत्पन्न बंद झाले. शासनाने कलावंताना आधार देऊन त्याच्या पोटापाण्याची सोय करावी.
-बळीराम हनवते, गीतकार तथा शाहिर, हिमायतनगर
लोककलावंत आणि ईतर कलावंताच जगन आता मुस्कील झाल आहे."आधिच दूष्काळ त्यात तेरावा महिना " अशी गत या लाकडाऊनमूळ झाली आहे.व्यवसायावरच पाणी फेरल्याने कलावंत चारही बाजूने अडचणीत आला आहे. शासनाने दिलेले मानधन "बूडत्याला काडीचा आधार होय" यावर भागतनाही तेव्हां ऊपेक्षीत असलेल्या कलाकाराना भरीव मदत करुन शासनाने त्याच्या दू:खावर फूंकर घालणे आता गरजेचे आहे.
- रमेश गीरी, शाहीर, नांदेड.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.