नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळांना होणार लिंक

ग्रामीण भागातील अंगणवाडी लगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा हेतू यामागचा असल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
अंगणवाडी केंद्र
अंगणवाडी केंद्र
Updated on

नांदेड : ग्रामीण भागातील अंगणवाडी लगतच्या शाळांना ( Nanded School) आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा हेतू यामागचा असल्याचे शिक्षण विभागातील (Education department) वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. Anganwadi Zilla Parishad schools in Nanded district will be linked

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरवात अंगणवाडीपासून होते. त्यामुळे या अंगणवाडी दर्जेदार असायला पाहिजेत. त्यासाठी अंगणवाडीमध्येच मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यावर विभागाचा भर असणार आहे. सद्यः स्थितीत मोजक्याच अंगणवाड्यांची स्थिती चांगली आहे. अनेक अंगणवाड्या किरायच्या इमारतीत आहेत. काही मदतनिसांच्या घरीच भरतात तर काही ग्रामपंचायत, समाज मंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय संपलेले नाहीत, हे लक्षात घेऊन लढ्याची पुढची वाटचाल कशा रीतीने करता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

‘एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन-तीन अंगणवाडी’ या तत्‍त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत. नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत तीन हजार १० अंगणवाड्या आहेत. यातील ३३८ अंगणवाड्या आधीच शाळा इमारतीत भरत आहेत. त्यामुळे दोन हजार ६७२ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शासनाच्या वतीने शाळांसाठी निधी देण्यात येतो. याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यांना होणार आहे. ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये पालक मुलांना टाकतात. त्यानंतर मुलांना दूर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश द्यावा लागतो. यामुळे अनेक पालक हे खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. काही खासगी शाळांकडूनही या प्रकाराचा फायदा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे वळविण्यात येते. शाळांमध्ये अंगणवाडी असल्यास पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. अंगणवाडीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासही मदत होणार आहे. अंगणवाड्या लिंक केल्याने त्यांना युडायस क्रमांक देखील मिळेल.

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील अंगणवाड्या

स्वतःच्या इमारतीत भरतात - २००४

शाळेत भरतात - ३३८

सार्वजनिक ठिकाणी - ४०५

मदतनिस यांच्या घरात - २६

किरायाच्या इमारतीत - २३७

जिल्ह्यातील तालुकानिहाय अंगणवाड्यांची संख्या

किनवट- ३७०, मुखेड- २८३, देगलूर- २११, बिलोली- १६५, कंधार- २४०, भोकर- १४०, हदगाव- २८२, नांदेड- २०८, लोहा- २४२, नायगाव- २०५, माहूर - १३१, उमरी- ९८, मुदखेड- ९४, हिमायतनगर- १३२, धर्माबाद- ८५, अर्धापूर- १२४, एकूण- ३०१०

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.