रुग्णाच्या जिवाची किंमत पैशात न मोजणारा देवदूत...

nanded photo
nanded photo
Updated on

नांदेड : डॉक्टरांकडे पुरेसा स्टाफ अथवा सुरक्षा किट नसल्याकारणाने काही डॉक्टर रुग्णास तपासण्यासाठी सध्याच्या जोखमीच्या काळात धजावत नाहीत. हे काही प्रमाणात खरे असेल तरी, मात्र ‘कोरोना’ आणि ‘लॉकडाउन’च्या काळात देखील पैसा नव्हे तर रुग्णाचा जीव वाचणे महत्वाचा आहे, या भावनेतून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुग्णास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्टर नावाच्या देवदूतांची संख्या काही कमी नाही. असेच एक देवदूत एका महिलेला नांदेडमध्ये भेटले आणि त्यांनी रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्यापेक्षा जीव वाचविण्याला प्राधान्य दिले.

दोन दिवसांपूर्वी नांदेडच्या गॅलेक्सी रुग्णालयात एक ४५ वर्षीय महिला दाखल झाली होती. तिला ‘लिव्हर’चा आजार असल्याने तिच्या जठरातील नस फाटुन अचानक तिला रुग्णालयातच रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. तेव्हा डॉ. नितीन जोशी यांनी ती महिला कोण आहे, कुठुन आली, तिच्याकडे पैसे आहेत का नाही, याची शहानिशा न करता तिच्यावर तातडीने ‘एंडोस्कोपी’ करुन जठरातील फाटलेली नस बंद केली. डॉक्टर नितीन जोशी यांच्या तत्परतेने रक्ताच्या उलट्या करणाऱ्या महिलेस जिवदान मिळाले.

हेही वाचा - Video: ‘कोरोना’मुळे अख्खे जग नाचतंय आॅनलाईनच्या तालावर, कसं? ते वाचाच

हिमोग्लोबिनची मात्रा कमी

रुग्णालयात आलेली ४५ वर्षीय महिला घरी एकटीच राहते. तिचा भाऊ शासकीय १०८ रुग्णवाहिका चालवून उपजिविका भागवतो. १५ दिवसांपूर्वी या महिलेस रक्ताच्या उलट्या झाल्याने त्या महिलेस डॉ. ऋतुराज जाधव यांनी गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये पाठविले होते. तेव्हा डॉक्टर जोशी यांनी तिची तपासणी करुन एंडोस्कोपी करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या शरिरात हिमोग्लोबिनची मात्रा कमी होती. म्हणून एका हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले.

एंडोस्कोपी केल्यानंतर मात्र तिच्या रक्ताच्या उलट्या थांबल्या

 रुग्णालयात त्या महिलेस रक्त चढलवल्यानंतर डॉ. जोशी यांनी त्या रुग्ण महिलेची एंडोस्कोपी केली. यापुढे जाऊन नस ब्लॉक करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती दिली होती. परंतु, या दरम्यान तिच्या जठरातील नस फाटली नव्हती. मात्र, पुरेशे पैसे नसल्याने आजार अंगावर काढत दिवस पुढे ढकलणे सुरु होते. नियमित तपासणीसाठी ती दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आली आणि रक्ताच्या उलट्या करु लागली. डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिची एंडोस्कोपी केल्यानंतर मात्र तिच्या रक्ताच्या उलट्या थांबल्या.

माझे काम मी प्रामाणिकपणे केले

रक्ताच्या उलट्या करणाऱ्या महिलेकडे पुरेश पैसे नव्हते, तरी देखील मी एक डॉक्टर म्हणून पैशाला जास्त महत्व न देता त्या महिलेचे प्राण वाचवण्यास अधिक महत्व दिले. शस्त्रक्रियेनंतर त्या महिलेस एक दिवस अतिदक्षता विभागामध्ये ठेवणे गरजेचे होते. परंतु, पैसे नसल्याने ते घरी जाण्याच्या प्रयत्नात होते. मी तिला शासकीय रुग्णालयातील आयसीयुमध्ये पाठवले. दुसऱ्यादिवशी तिला सुट्टी झाली तेव्हा पैसे नसल्याचे सांगुन ती मोकळी झाली. पण माझे काम मी प्रामाणिकपणे केले होते. त्याची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही.
-डॉ. नितीन जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.