नांदेड - कोरोना चाचणीच्या संदर्भात सोमवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या ११५ अहवालामध्ये एनआरआय यात्री निवास कोविड सेंटरमधील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सदरील रुग्ण हा ६० वर्षाचा असून तो दिल्ली येथील रहिवासी आहे. नांदेडमध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेड शहरातील काही झोन कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. ११) आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.
एक हजार ८२८ जणांचे घेतले स्वॅब
नांदेडला आजतागायत एकूण प्रवासी आणि प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाद्वारे ९८ हजार ६९० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एकूण एक हजार ८२८ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी एक हजार ७०२ स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. अजून ३८ अहवाल प्रलंबित आहेत. सदर घेतलेल्या एकूण स्वॅबपैकी ५३ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
एक रुग्ण पॉझिटिव्ह
जिल्हा प्रशासनाला प्राप्त एकूण ११५ अहवालानुसार एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. तो रुग्ण दिल्लीचा असून त्याचे वय ६० आहे. तसेच ११४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू
एकूण ५२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ रुग्ण विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे तर ३३ रुग्णांवर यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे तसेच एका रुग्णावर माहूर कोविड केअर सेंटर येथे औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच आत्तापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या पाच रुग्णांनी औषधोपचारास प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. रक्तदाब, मधुमेह या आजाराने हे पाचही रुग्ण त्रस्त होते. त्यामुळे रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
हेही वाचलेच पाहिजे - Video - सीमेपर्यंतचा मजूरांचा प्रवास ‘लालपरी’ करणार सुखकर
मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा
नांदेडकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन द्यावे, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणस सदरील ॲप सतर्क करण्यात मदत करते, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.