नांदेड : मुदत संपून निवडणुक लागलेल्या परंतु कोरोनामुळे निवडणूक पूढे ढकललेल्या लोहा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी विस्तार अधिकाऱ्यांना सक्षम प्राधीकारी म्हणुन नियुक्ती केली आहे. यामुळे या गावाच कारभार आता प्रशासकाच्या हाती गेला आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचातीवर प्रशासक
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित केल्या होत्या. या ग्रामपंचायतीसाठी ता. ३१ मार्च रोजी निवडणुक होणार होती. परंतु तत्पुर्वीच कोरोना विषाणूचा फैलाव वाढल्यामुळे शासनाने लॉकडाउन घोषीत केला होता. यामुळे कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे किंवा येणार आहे अशा ग्रामपंचायतचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ अन्वये पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा....ग्रामीण भागातही लॉकडाउन पाळण्याची गरज
कोरोनामुळे निवडणुक ढकलली पूढे
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. परंतु लॉकडाउन कार्यकाळ वाढत जात असल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मुदत संपून ग्रामपंचायत निवडणुका लागलेल्या शंभर ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
हेही वाचलेच पाहिजे....लॉकडाउन नंतर बेरोजगारांना सावरण्याची संधी....कोण म्हणतय ते वाचा
‘सिइओं’ना केले प्राधीकृत अधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सक्षम प्राधिकारी नियुक्त करून जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायत व प्रशासक निवडण्याचे नियुक्त करण्याचे आदेश दिले. यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांना या बाबत कारवाई करण्याची सूचना केली होती. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेशित करून निवडणूक पुढे ढकलल्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्याचे आदेश काढले होते.
लोहा तालुक्यातील दहा ग्रामपंचायती
यानुसार लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच निवडणुकांची तारीख घोषित झालेल्या दहा ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यात कामळज, जोशी सांगवी व जोमेगाव ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी डी. पी. धर्मेकर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून निवड केली आहे. तर हळदव, चितळी व मुरंबी ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी एस. टी. शेठवाढ यांची नियुक्ती केली आहे. तर गोंडगाव, धानोरा म. या ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी आणि कलंबर खुर्द आणि बोरगाव आ. ग्रामपंचायतीसाठी विस्ताराधिकारी आर. पी. भोसीकर यांची नियुक्ती केली आहे. संबंधित सक्षम प्राधिकारी यांना ता. २० एप्रिल पासून सरपंचपदाच्या अधिकाराचे व त्यांचे सर्व कार्य व कर्तव्य पार पाडण्याचे श्री फांजेवाड यांनी आदेशीत केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.