अर्धापूर : नगरपंचायत (Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना विविध पक्षांच्या सभा, बैठका, प्रचारफेरी, उमदेवारांच्या गृह भेटीने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत (Election) काँग्रेस व भारतीय जनता पक्षात मुख्य लढत होत असून काही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम, अपक्षांनी खूप मोठे आव्हान निर्माण केले आहे.
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील विविध प्रभागात दुरंगी, तिरंगी तर काही प्रभागात बहुरंगी लढतीचे चित्र पाहण्यास मिळत आहे. नगरपंचायत स्थापनेपासून ही तिसरी निवडणूक होत आहे. नगरपंचायतमध्ये १७ प्रभाग असून मंगळवारी (ता.२१) तेरा प्रभागासाठी मतदान घेण्यात येणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात असून या पक्षाचे तेरा उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीरकर, विधानसभा अध्यक्ष नितेश देशमुख, तालुका अध्यक्ष बालाजी स्वामी माजी सभापती बाबुराव हेंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, तालुका सरचिटणीस अवधूत कदम, महिला पदाधिकारी यांनी सभा, बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील नगरपंचायत असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. उमेदवारी देण्याच्या शाह कटशाहच्या खेळीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये काँग्रेसच्या अपक्ष उमेदवाला पुरस्कृत करावे लागले.
काँग्रेसच्या चिन्हावर बारा वार्डात उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे शहराध्यक्ष राजू शेटे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचार केला.
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे तालुका प्रमुख संतोष कपाटे तालुका अध्यक्ष उद्धव राजेगोरे, संतोष गव्हाणे यांनी प्रचार करुन मतदारांना कौल मागितला. या आघाडीचे नऊ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.