Ashadhi Wari : धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी! पंढरपूरला जाण्यासाठी तब्बल 'इतक्या' बसेसची सोय

महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वच जण अतूर झाले आहेत.
Pandharpur Wari in Maharashtra
Pandharpur Wari in Maharashtraesakal
Updated on
Summary

कोणत्याही देशात न होणारा असा भव्य आषाढी सोहळा साजरा करण्यासाठी मग महाराष्ट्राची लालपरी तरी मागे कशी राहणार?

नांदेड : महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या (Pandharpur Wari 2023) दर्शनासाठी सर्वच जण अतूर झाले आहेत. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने वेळ प्रसंगी पायी चालत सावळ्या विठ्ठलाची मनमोहक मूर्ती डोळ्यात साठविण्यासाठी विठ्ठल भक्त पंढरपूरकडे कूच करत आहेत.

कोणत्याही देशात न होणारा असा भव्य आषाढी सोहळा साजरा करण्यासाठी मग महाराष्ट्राची लालपरी तरी मागे कशी राहणार? पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Maharashtra State Transport Corporation) नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारांतून २५० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Pandharpur Wari in Maharashtra
Monsoon Update : मिरगाचा पाऊस कधी पडणार? शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, 'हवामान'चा अंदाजही ठरला फोल

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. तब्बल महिनाभर आधीपासून भाविक राज्याच्या कान्याकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला जात असतात. दरवर्षी हा सोहळा नयनरम्य ठरत असतो. लाखो वारकरी हातात भागवत धर्माची पताका घेऊन दिंडीत सहभागी होतात. राज्यभरातून हजारो दिंड्याद्वारे लाखो वारकरी पायी वारीत सहभागी असतात.

Pandharpur Wari in Maharashtra
Monsoon Update : राज्यात जोरदार पाऊस बरसणार; 'हा' पक्षी थेट आफ्रिकेतून आला सांगावा घेऊन..

दरवर्षी छोट्या मोठ्या अशा अनेक दिंड्या नांदेड जिल्ह्यातूनही पंढरपूरकडे जात असतात. नांदेड जिल्ह्यातही वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. महिन्याची वारी करणारेही अनेक जण असतात. मात्र, आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपूरकडे जाणारे शेकडो भाविक नांदेड जिल्ह्यातील असतात. या सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातर्फे दरवर्षी विशेष बसची व्यवस्था करण्यात येते.

कोरोना संसर्गाच्या काळात मागील दोन वर्षे ही बससेवा बंद होती. परंतु, गेल्या वर्षापासून परत मोठ्या उत्साहात आषाढी यात्रेची बससेवा महामंडळाने सुरु केली आहे. यंदाही ही बससेवा येत्या ता. २५ जूनपासून सुरु होणार आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यातील तब्बल २५० बस पंढरपूरसाठी विशेष म्हणून सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात नऊ आगार असून या नऊ आगारांतून ता. २५ जून ते ता. चार जुलै या कालावधीत २५० बस सोडण्यात येणार आहेत.

Pandharpur Wari in Maharashtra
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

जिल्ह्यातील आगारनिहाय बसचे नियोजन

आगाराचे नाव बसची संख्या

  • नांदेड ५०

  • भोकर २६

  • किनवट १६

  • मुखेड ३६

  • देगलूर ३१

  • कंधार ३६

  • हदगाव २१

  • बिलोली २६

  • माहूर ०८

  • एकूण २५०

पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात येतात. यंदाही ता. २५ जून ते ता. चार जुलै या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी बस सोडण्यात येणार आहेत. आगार परिसरातील गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी ४० ते ४५ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास त्या गावातून थेट जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आगार प्रमुख आणि बसस्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क करावा. पंढरपूर येथेही नांदेड जिल्ह्यातील आगाराच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- कमलेश भारती, विभागीय वाहतूक अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.