nanded
nandedsakal

Nanded : महापालिका पाणीपुरवठा योजनेला अमृत दोनअंतर्गत मान्यता द्यावी ;अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रस्ताव नांदेड वाघाळा महापालिकेने छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविला होता.
Published on

नांदेड : शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार व विस्तारित भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई या बाबी लक्षात घेऊन नांदेड शहरासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेतंर्गत तयार केलेल्या १६७ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिकेने अमृत - दोन अभियानांतर्गत नांदेड शहर पाणीपुरवठा योजना बळकटीकरण व संलग्नीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता.

या संदर्भातील आवश्‍यक तो प्रस्ताव नांदेड वाघाळा महापालिकेने छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी महापालिकेच्या १६७ कोटी ६४ लाख रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस अमृत - दोन अंतर्गत तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. आता या वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाची मान्यता मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

nanded
Nanded : नियमबाह्य पद्धतीने गतीरोधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com