नांदेड- संबंध राज्यभर गाजलेल्या बनावट परीक्षार्थीच्या माध्यमातून नांदेडच्या सांख्यिकी कार्यालयात नोकरी मिळविणाऱ्या एका बोगस उमेदवाराला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (ता. २१) अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी ता. २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.
राज्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बोगस उमेदवारांना परीक्षा द्यायला लावायच्या आणि मुळात नोकरी दुसऱ्यालाच मिळायची असा प्रकार मांडवी पोलिस ठाण्यात सन २०१६ मध्ये गुन्हा क्रमांक २७ नुसार दाखल झाला होता. गुन्ह्यातील तक्रारीनुसार हा प्रकार २००७ ते २०१६ असा सुरू होता. हा गुन्हा राज्य सरकारच्या आदेशाने तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करणारे एक सहाय्यक पोलिस निरीक्षकसुद्धा या गुन्ह्यात आरोपी झाले.
परीक्षा देणारे आणि सध्या पोलिस विभागात अधिकारी पदावर कार्यरत असणारे काही अधिकारीसुद्धा यात आरोपी झाले. यांनी खोटे उमेदवारांच्या माध्यमाने परीक्षा उत्तीर्ण करून सरकारी नोकऱ्या मिळविल्या अशा अनेकांचा यात आरोपी म्हणून समावेश झाला. आजपर्यंत या गुन्ह्यात सीआयडीने ३७ आरोपी अटक केले. त्यातील काही जणांना जामीन मिळाला आहे, पण काही जण अद्यापही कारागृहातच आहेत.
हेही वाचा - अबब...चोरीच्या 32 मोटारसायकल पाथरीतून जप्त
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी मांडवीच्या गुन्हा क्रमांक २७- २०१६ मध्ये धीरज ध्रुवा जाधव याला अटक केली. त्याला नांदेड न्यायालयासमोर हजर केले. हा व्यक्ती सांख्यिकी सहाय्यक या पदावर जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे. त्याने दिलेल्या स्पर्धा परीक्षेतील अभिलेखाची तपासणी केली तेव्हा परीक्षा देताना वापरलेल्या अंगठ्यांचे निशान वेगळे आहेत आणि धीरज ध्रुवा जाधव याच्या अंगठ्याची निशाणी वेगळे आहे.
गुरुवारी (ता. २१) पोलिस कोठडी मागण्यासाठी सीआयडीच्या पोलिसांनी न्यायालयात आणल्यानंतर सरकारी वकील रणजित देशमुख यांनी याप्रकरणी बाजू मांडताना सांगितले की, डमी उमेदवार कोण होता याचा शोध घेणे आहे आणि त्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती केली. यावेळी न्यायाधीश एस. एस. खरात यांनी ही विनंती मान्य करत धीरज जाधवला ता. २५ जानेवारीपर्यंत पोलिस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.