पोलिसांवरील हल्ला दुर्देवी; दोषींविरुध्द कठोर कारवाई करु - पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला. 
नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला. 
Updated on

नांदेड - पोलीसांवरील काही समाजकंटकांनी केलेला हल्ला अत्यंत दुर्देवी असून या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. नांदेडमध्ये अशी घटना घडणे वाईट आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेतर्फे हल्लाबोल कार्यक्रम होवू नये, यासाठी चर्चा करुन कार्यक्रम करू नये, असा निर्णय झाला होता. तथापी, हल्लाबोलमध्ये कांही समाज कंटकांनी पोलीसांवर हल्ल्याचे जे कृत्य केले त्या दोषी लोकांविरुध्द शासनातर्फे कठोरातील कठोर कारवाई करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ३०) सांगितले. 

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची यावेळी उपस्थिती होती. 

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 
या हल्ल्यातील जखमी पोलीसांची त्यांनी आस्थेने विचारपूस करुन त्यांना ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या तत्काळ पुरविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. या बैठकीनंतर त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर आदींची यावेळी उपस्थिती होती. कोरोना सदृश्य आजार असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांनी काळजी, स्वयंशिस्त व उपचार घेणे यातच सर्वांचे हित आहे. केवळ भितीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे आग्रह धरला नाही तर स्वाभाविकच जे खरे गरजू आहेत त्या कोरोना रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा पोहचविणे रुग्णालय व्यवस्थापनाला शक्य होईल, असे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
 
हेही वाचलेच पाहिजे - पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही- पोलिस अधीक्षक शेवाळे

 

आणखी दोनशे खाटांची वाढ 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा असून जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी विविध उपाययोजनांसह आवाहनही केले जात आहे. वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता आता शासकीय रुग्णालयामध्ये आणखी दोनशे खाटा वाढविण्यात येत आहेत. कोरोना सदृश्य आजार असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांनी काळजी, स्वयंशिस्त व उपचार घेणे यातच सर्वांचे हित आहे. केवळ भीतीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे आग्रह धरला नाही तर स्वाभाविकच जे खरे गरजू आहेत त्या कोरोना रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा पोहचविणे रुग्णालय व्यवस्थापनाला शक्य होईल, अशी माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. आजच्या घडीला मागील कांही दिवसापासून दिवसाला एक हजाराहून अधिक बाधित निघत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. ज्यांना लक्षणे नाहीत व जे बाधित गोळ्या, औषधातून बरे होणारे आहेत अशा असिम्टोमॅटिक व्यक्तींसाठी आपण महसूल भवन आणि एनआरआय कोविड केअर सेंटर टप्प्या - टप्प्याने वाढवित आहोत. जिल्हा रुग्णालयात ६० ते ७० बेड्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ७० ते १२० बेड्स तर खासगी दवाखान्यात जवळपास २० ते ३० बेड्स वाढविले जात आहे. आरोग्यासाठी निधीची कमतरता नाही. जिल्ह्याला अतिरिक्त निधी कसा उपलब्ध होईल यादृष्टिने आम्ही नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

जनतेनेही सहकार्य वाढविले पाहिजे - अशोक चव्हाण
कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची टिम वर्षभर राबते आहे. सर्वजण मेहनत घेत आहेत. प्रशासनाच्या या अखंड सुरु असलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला जनतेनेही आता सहकार्य वाढविले पाहिजे. भाजीपाला दारावर घेतला पाहिजे. बाहेर विनाकारण गर्दी करणे टाळले पाहिजे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, यात ज्यांचे पोट हातावर आहे. त्याच्या रोजगाराची जाणीव आम्हाला आहे. मात्र जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती लक्षात घेता कांही कठोर निर्णय घेणे जिल्हा प्रशासनाला केंव्हा-केंव्हा क्रमप्राप्त ठरते.  
- अशोक चव्हाण, पालकमंत्री. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()