Nanded News : ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार!

‘स्थानिक’च्या निवडणुकांकडे लक्ष; अनेक महिन्यांपासून कार्यकर्ते प्रतीक्षेत
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन नगरपंचायत आणि एक नगरपालिका वगळता उर्वरित महापालिका, जिल्हा परिषद, १६ पंचायत समित्या तसेच ११ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीवर गेल्या कित्येक महिन्यापासून ‘प्रशासक राज’ सुरू आहे. आज ना उद्या निवडणुका जाहीर होतील, या आशेवर जवळपास सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रतिक्षेत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मनमानी कारभार सुरू असल्याने नेतेमंडळीही वैतागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

जिल्ह्यात एक महापालिका, एक जिल्हा परिषद, १६ पंचायत समिती, १२ नगरपालिका आणि चार नगरपंचायती आहेत. त्यातील तीन नगरपंचायत आणि एक नगरपालिका वगळता उर्वरित सर्व ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे. महापालिकेत आयुक्त तर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

nanded
Nanded News : घरकुलांची होणार स्वप्नपूर्ती

उर्वरित नगरपालिका, नगरपंचायत व पंचायत समितीवर तहसीलदार, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार आदींची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील माहूर, अर्धापूर आणि नायगाव नगरपंचायतीची डिसेंबर २०२१ मध्ये निवडणुक झाली होती. त्यामुळे तेथे पदाधिकारी कार्यरत आहेत. तर लोहा नगरपालिकेची मुदत पुढील महिन्यात जानेवारी २०२४ मध्ये संपत आहे. त्यामुळे लोह्यातही नंतर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

कोरोना संसर्ग, राज्यातील सत्ताबदल तसेच न्यायालयीन खटले आदींमुळे निवडणुका लांबत चालल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात करण्यात येणाऱ्या आरक्षणावर आक्षेप घेत काही जणांकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्‍या निर्णयाकडे नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुका लांबत चालल्यामुळे आता सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मात्र संयम सुटत चालल्याचे चित्र आहे.

nanded
Nanded News : माळेगाव यात्रा ‘प्लास्टिकमुक्त’ करण्याचा संकल्प

स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुदत संपलेली तारिख

नांदेड वाघाळा महापालिका : आक्टोंबर २०२२

जिल्हा परिषद, पंचायत समिती: मार्च २०२२

भोकर नगरपालिका : मे २०२०

किनवट नगरपालिका :जानेवारी २०२३

हिमायतनगर नगरपंचायत : जानेवारी २०२१

हदगाव, उमरी, धर्माबाद नगरपालिका :डिसेंबर २०२

देगलूर, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुखेड, मुदखेड : फेब्रुवारी २०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.