नांदेड : बांबू शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने नांदेडात रविवारी (ता. १३) बांबू लागवड विषयावर एक दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सकाळी अकरा वाजता कार्यशाळा होणार आहे.
‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरण, नदी संवर्धन, शेती, उद्योग तसेच बांधकाम क्षेत्रात बांबूला महत्व असल्यामुळे शासन, खासगी संस्था बांबू लागवडीला चालना देत आहेत. बांबूची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येत असून कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते. बांबूनिर्मित वस्तु उद्योग, त्यातून तयार झालेल्या मुल्यवर्धित वस्तुंना वाढती मागणी आहे. अशा या बांबू लागवडीद्वारे पर्यावरण रक्षणाचा जागर करणाऱ्या कार्यशाळेत वातावरणातील मुक्त कार्बनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी बांबूची शेती कशी फायदेशीर आहे. या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
बांबूपासून इथेनॉल निर्मिती शक्य असून देशाला इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविता येऊ शकते. बांबू शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली असून राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. बांबू लागवडी संदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ कोकण व केण डेव्हलपमेंटचे संचालक संजीव करपे, उपक्रमाची नॉलेज पार्टनर कंपनी जीओ लाईफ ॲग्रीटेक इंडिया प्रा. लि. चे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचे प्रतिशुल्क दोनशे रूपये असून आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आॅनलाइन प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.
नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१०९९७५७, ७६६६२३९४८७,
संकेतस्थळ : www.siilc.edu.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.