बिलोली तालुक्यात कोरोनामुळे मुलाच्या मृत्यूचा विरह सहन न झालेल्या मातेचाही मृत्यू 

file photo
file photo
Updated on

आरळी  ( जिल्हा नांदेड ) : गेल्या एक वर्षापासून कोरोना ह्या महामारीने धुमाकूळ घातला असून त्यामध्ये ऑक्टोबर २०२० मध्ये पाच महिण्यापूर्वी आरळी येथील माधव लाकडे (वय २६) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे दुःख सहन न झाल्यामुळे आई कलावतीबाई लाकडे ( वय ५६) यानां हृदय विकाराचा झटका आल्याने मंगळवार (ता. ३०मार्च ) रोजी निधन झाले. पाच महिन्यात एकाच कुंटूबात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे, गावात हळहळ व्यक्त होत आहे. परंतू कोरोना भितीमुळे, गावकर्‍या एैवजी पाहुणे मंडळीनीच उरकला अत्यंसंस्कार.

बिलोली तालूक्यातील आरळी येथील शेतकरी शंकरराव बाबाराव पाटील लाकडे ह्यानी काबाड कष्ट करून त्यांचे दोन मुलं माधव आणि उमाकांत यानां लहानपणा  पासूनच उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे पाठवून त्यांच शिक्षण पूर्ण केले. आपली मुलं उच्च शिक्षण घेऊन मोठे आधिकारी व्हावे हे ध्येय बाळगून होते. परंतु नियतीने त्यांचे स्वप्न भंग करत गेल्या वर्षी ता. २० ऑक्टोंबर २०२० रोजी कोरोनाच्या महामारीने अविवाहीत माधव लाकडे ( वय २६) यांचा बळी घेतला होता.

या आघाताने सर्व कुटूंब दुः खात बुडाले. कसे तरी वडिल शंकरराव पाटिल लाकडे यांनी आपला परिवार सावरत होते परंतू आई कलावतीबाई शंकरराव लाकडे ह्याना मात्र मुलाचे दुः ख विसरता आले नाही. त्या गेल्या पाच महिन्यापासून सतत विचार मग्न राहत होत्या. त्यातच शनिवार (ता. २७ ) रोजी अचानक चक्कर येऊन तब्येत बिघडली. तेंव्हा खाजगी उपचार करूनही फरक पडत नव्हता शेवटी पूढील उपचारासाठी मंगळवार (ता. ३०) रोजी शासकिय रुग्णालय विष्णूपूरी नांदेड येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच कलावतीबाई शंकरराव लाकडे ( वय ५६) यांचे मंगळवार (ता. ३०) रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले व तसे वैद्यकिय प्रमाणपत्र प्राप्त झाले.  

परंतू जिल्ह्यात कोरोनाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे, अत्यंविधी कुठे करावे ही संभ्रम अवस्था निमार्ण होऊन कांही नातेवाईकाच्या आग्राहखातर शेवटी आरळी येथेच अत्यंसंस्कार करण्याचे ठरले. मृतदेह गावात आणला परंतू कोरोनाच्या भितीपोटी गावातील बहुतांशी नातेवाईकाने दुरुनच राहणे पसंत केले. जवळ कुणीच आले नाहीत शेवटी उपस्थित पाहुणे मंडळीनेच अत्यंसंस्कार उरकला. कलावतीबाई शंकरराव लाकडे यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन आणि नातवंड असा परिवार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.