Video - नांदेडात भाजपने केली वीज बिलाची होळी 

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिलाची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजप महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (ता. दोन) जुलै रोजी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. तसेच राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन महिने टाळेबंदी होती. त्यामुळे संपूर्ण व्यवहार बंद होते. असे असतानाही वीज वितरण कंपनीने माहे एप्रिल ते जून या महिन्याचे तीस ते चाळीस हजाराच्या आसपास एकत्रित बिल दिले आहे. कुठलीही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारला आहे.

वीज बिल माफ करण्याची घोषणा हवेतच

राज्य सरकारमधील मंत्र्यांनी तर आधी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नंतर १०० युनिटपर्यंत माफी देण्यात येईल असेही सांगितले होते. परंतु घोषणेची अंमलबजावणी न करता उलट ३० ते ४० हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. टाळेबंदीच्या काळात सहकार्य करणाऱ्या जनतेलाच धोका देण्याचे काम राज्य सरकार व वितरण कंपनीने केले आहे. त्यामुळे तातडीने वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगरच्या वतीने भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी करण्यात आली. राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंत्यांना  निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात युवा मोर्चा प्रदेश प्रभारी संजय कौडगे, वैद्यकीय आघाडीचे डॉ.अजित गोपछडे, सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील, व्यंकटराव मोकले, उपाध्यक्ष प्रभू कपाटे, सुशील चव्हाण, राजेंद्रसिंग पुजारी, शीतल खंडील, सुनील राणे, शीतल भालके, नवल पोकर्ना, अकबरखान पठाण, कुणाल गजभारे, महादेवी मठपती, गायत्री तपके, सुषमा ठाकूर, किरपालसिंग हुजुरीया, राजाराम टोम्पे, संदीप कर्‍हाळे, सोनू उपाध्याय, अनिल हजारी, मनोज यादव, चंचलसिंग जट, सिद्धार्थ धुतराज, धीरज स्वामी, मारोती वाघ, आशिष नेरळकर, हरभाजसिंग पुजारी, भालचंद्र पत्की, सुनील मोरे, ऍड.अभिषेक नाईक.

संभाजी देशमुख,श्रीराज चक्रवार, आशुतोष जोशी, व्यंकटेश जोशी, शंकर मनाळकर, प्रशांत पळसकर, संजय घोगरे, शैलेश कर्‍हाळे, सचिन रावका, सुदेश पईतवार , चक्रधर कोकाटे, निक्की सोखी, जसबिनदसिंग सोखी, अनुपसिंग दफेदार, रवी वाघमारे, बाळू लोंढे, धनंजय नलबलवार,अनील जगताप,वैशाली देबडवार,सतीष बेरूळकर, संकेत कुराडे , गजानन जोशी,विशाल शुक्ला, सागर बिसेन आदींसह अनेकांची उपस्थिती होती.या आंदोलनात भरमसाठ वीज बिल आलेल्या ग्राहकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून वीज वितरण कंपनीचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.