लोहा, (जि. नांदेड) : एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र सुरू असताना मात्र जिल्ह्यातील अनेक वाड्या, तांडे विकासापासून कोसो दूर आहेत. लोहा तालुक्यातील थावरा तांडा या गावात गुरुवारी (ता.१५) पक्का रस्ता नसल्याने वऱ्हाडींना चिखल तुडवीत विवाहस्थळ गाठावे लागले. सकाळी साडेअकराचा मुहूर्त खराब रस्त्यामुळे चुकला आणि दुपारी सव्वातीन वाजता वधूवरांवर अक्षता पडल्या. मात्र यासाठी वधू-वरांना कडेवर घेऊन थावरा तांडा गाठावे लागले.