नांदेड महापालिकेत सभापती विरेंद्रसिंग गाडीवालेंनी सादर केला अर्थसंकल्प 

नांदेड - स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी मंगळवारी महापौर मोहिनी येवनकर यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. 
नांदेड - स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी मंगळवारी महापौर मोहिनी येवनकर यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. 
Updated on

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या २०२१ - २२ च्या अर्थसंकल्पात किरकोळ बदल करून अंदाजपत्रक महसुली ९६ कोटी ८५ लाख आणि भांडवली शासन निधींमध्ये २२० कोटी अशी एकूण ३१६ कोटी ८५ लाख रुपयांची वाढ सुचवुन स्थायी समितीच्या वतीने सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प महापौर मोहिनी येवनकर यांच्याकडे मंगळवारी (ता. ३०) अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. 

महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी एक वाजता स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी २०२०- २१ चा सुधारित आणि २०२१ - २२ चे मूळ अर्थसंकल्प सादर केला. यावेळी उपमहापौर मसूद खान, उपायुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, मुख्य लेखा परिक्षक टी. एल. भिसे, लेखाधिकारी शोभा मुंढे यांच्यासह मोजके पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. उर्वरित पदाधिकारी, सदस्यांनी आॅनलाइन सहभाग नोंदवला. महापौर येवनकर यांनी याबाबत पदाधिकारी व सदस्यांना अभ्यासासाठी वेळ मागितला असून येत्या आठवडाभरात अर्थसंकल्पीय सभा बोलविण्यात येणार असल्याचे सांगितले. 

९६२ कोटी ४२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प 
प्रशासनातर्फे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ता. दहा मार्च रोजी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला होता. २०२० - २१ चा मूळ अर्थसंकल्प हा ८९४ कोटी २४ लाख रुपयांचा होता. तो सुधारित ६७८ कोटी ३५ लाख रुपयांचा झाला. तसेच २०२१ - २२ या वर्षीचा ६४५ कोटी ५७ लाख रुपयांचा आणि एक लाख ७६ हजार ६५४ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती गाडीवाले आणि सदस्यांनी त्यावर अभ्यास करून अर्थसंकल्प तयार केला. त्यानंतर त्यामध्ये महसुली आणि भांडवली अशी एकूण ३१६ कोटी ८५ लाख रुपयांची वाढ सुचवून ९६२ कोटी ४२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सभापती श्री. गाडीवाले यांनी सादर केला आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आजी - माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदींचे आभारही मानले आहेत. 

  1. श्री गुरूगोविंदसिंगजी यांचे वडील श्री गुरू तेगबहाद्दरजी यांची चारशेवी जयंती ता. एक मे रोजी असून त्यानिमित्त त्यांच्या नावाने नांदेडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडीयम उभारणे. 
  2. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कॉमन मॅनचे शिल्प उभारणे. 
  3. स्मशानभूमी, क्रबस्थान आणि परिसराचा विकास तसेच शवदाहिनी उभारणे. 
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभिकरण व संविधानाचे तैलचित्र उभारणे. 
  5. हैदराबादच्या धर्तीवर लु कॅफेनुसार अद्यायावत स्वच्छतागृहाची उभारणी करणे.
  6. ट्रक टर्मिनल उभारणे. 
  7. भाजीपाला आणि फळ मार्केटसाठी जागा निच्शित करून विकसीत करणे. 
  8. सोलार ग्रीड प्रकल्प उभारून वीजेच्या खर्चात कपात होण्यासाठी नियोजन करणे. 
  9. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, स्वच्छता सेवा, आरोग्य सुविधा, नगररचना विभाग आदींचे सक्षमीकरण व नव्याने उपाययोजना करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.