नांदेड - नांदेड शहरासोबत आता जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता आणखी विशेष लक्ष देऊन दक्षता घेण्यासोबतच उपाययोजना कराव्या लागणार आहेत. लॉकडाउनमध्ये गेल्या चार दिवसांपासून शिथिलता देण्यात आली असल्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेतील वाढती गर्दी लक्षात घेता आता सावधान रहावे लागणार असून कोरोना कधीही तुमच्या घरात येऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण भारतात आणि महाराष्ट्रात आढळून आल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. आतापर्यंत गेल्या दोन अडीच महिन्यात पाच लॉकडाउन झाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्हा प्रशासनासह पोलिस विभागाने सतर्कता बाळगत चांगल्या पद्धतीने बंदोबस्त केला. महापालिकेने कंटेनमेंट झोन जाहीर करत आरोग्य विभागाच्या पथकाने नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. मात्र, आता पाचव्या लॉकडाउननंतर गेल्या चार दिवसांपासून शिथिलता देण्यात आली. त्यामुळे नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा - Video - कोरोनाला हरवून अशोक चव्हाण ठरले बाजीगर...
अधिक रहावे लागणार सजग
रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान बारा तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई - आयुक्त
लॉकडाउन शिथिल केला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले. हळूहळू बंद असलेला व्यवहार सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, त्याचा नागरिकांना गैरफायदा घेऊ नये. विनाकारण रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी करु नये. कारण कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून काळजी घ्यावी. अन्यथा विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.
हेही वाचलेच पाहिजे - पॉझिटिव्ह न्यूज - सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले...
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी. त्यासाठी नागरिकांनी पुढील सूचनांचे पालन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.