नांदेड - कोरोनाचे रुग्ण शहरातील नवीन भागातही काही ठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेता शहरातील पन्नास वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिकेसमोर ज्येष्ठांच्या आरोग्य तपासणीचे आव्हान असणार आहे.
नांदेड महापालिकेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सुधीर इंगोले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, डॉ. बदियोद्दीन आदी उपस्थित होते.
कंटेनमेंट झोनबाबतचा आढावा
ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळला आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कंटेनमेंट झोन तयार करण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमधील फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर देगलूर नाका भागातील रहेमतनगर, तुराबनगर, मिल्लतनगर, गुलजार बाग, उमर कॉलनी आदी भागातील कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे या भागातील पन्नास वर्षावरील नागरिकांची महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहेत.
२५ आरोग्य पथकाची स्थापना
सुरवातीला कंटेनमेंट झोनमधील पन्नास वर्षापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने २५ आरोग्य पथकांची स्थापना केली आहे. तसेच आत्तापर्यंत तीन हजार सहाशे कुटुंबातील एक हजार सहाशे ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ७० जणांना रक्तदाब तर ४५ जणांना मधुमेह असल्याचे निदान झाले आहे. या शिवाय आॅक्सीजन (एसपीओटू) कमी असलेले १२ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सुमारे एक लाख २० हजार मालमत्ताधारक असून त्यानुसार वैद्यकीय पथके तयार करण्या आली आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, मास्क, सॅनीटायझर तसेच फेसमास्क शिल्डचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.
हेही वाचलेच पाहिजे - एक अनोळखी लिंक करू शकते आपला खिसा रिकामा, कशी ते वाचा...
नगरसेवकांची घेणार मदत
शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही बैठकीला बोलाविण्यात आले होते. या तपासणीसाठी त्या त्या भागातील नगरसेवकांचीही मदत घेण्यात येणार आहे. नगरसेवकांनी देखील नागरिकांना आरोग्य तपासणीचे महत्व समजून सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये रक्तदाब, मधुमेह, आॅक्सीजन लेवल आदी बाबींची तपासणी केली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील सर्वच भागात ही तपासणी केली जाणार आहे. या पथकामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, परिचारिका यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. तसेच त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.