कुपोषित बालकांना शोधण्याचे नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान

आरोग्य यंत्रणा कार्यरत; कमी वजनाच्या ४३८ बालकांत सुधारणा
challenge of finding malnourished children Health Department of Nanded Zilla Parishad
challenge of finding malnourished children Health Department of Nanded Zilla Parishadsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले तरी जिल्हा पूर्णपणे कुपोषणमुक्त झाला नाही. कोरोना संसर्गामुळे आदिवासी भागातील कुपोषित मुलांना रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी आई - वडिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या तरी जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाचा कहर कमी झाल्यानंतर कमी वजनाची कुपोषित शोधून काढण्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान असणार आहे.

challenge of finding malnourished children Health Department of Nanded Zilla Parishad
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कुपोषित बालकांच्या आरोग्य सुधारणांसाठी अंगणवाडी केंद्रातील सर्व बालकांची अंगणवाडी सेविकांमार्फत दर तीन महिन्यास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्यानंतर सॅम (कमी वजनाची) बालकांची निश्चिती करण्यात आली. त्यानंतर आढळून आलेल्या सर्व बालकांची खात्री संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करून अंतिम झालेल्या सॅम बालकांची यादी तयार करण्यात आली. अशा बालकांची भूक चाचणी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तत्काळ घेण्यात येऊन सॅम बालकांना गृह ग्राम बाल विकास केंद्राच्या अंतर्गत सेवा देण्यात आली.

गृह ग्राम बाल विकास केंद्रातून अशा बालकांना अंगणवाडी केंद्रातील तसेच लाभार्थ्यांच्या घरच्या नियमित आहाराव्यतिरिक्त त्यांच्या आहाराबद्दल विशेष काळजी घेत आहाराचे नियोजन करण्यात आले. आवश्यकता भासल्यास बालकांवर औषधोपचार करण्यात आले. गृह ग्राम बाल विकास केंद्र १२ आठवडे चालविण्यात आल्याने सॅम बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली. या कालावधीत बालकांच्या घरी वारंवार गृहभेटी देऊन कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. या शिवाय अंगणवाडीतील बालकांना कोरोना काळात घरपोच आहार कच्या धान्याच्या स्वरूपात देण्यांत येऊन जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात यश आल्याचा दावा विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

challenge of finding malnourished children Health Department of Nanded Zilla Parishad
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

रेल्वे, बस बंदमुळे अडचणी

एसटी बस आणि रेल्वे सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील शंभर ते दोनशे किलोमीटरचे अंतर कापून खासगी वाहनाने अनेकांना येता आले नाही. शिवाय आरोग्य यंत्रणा देखील त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने बहुदा कुपोषणाचा आकडा कमी असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाभरात असे एकुण ५३३ सॅम बालके आढळून आली आहेत. त्यापैकी ४३८ सॅम बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर आणखी ९५ सॅम बालकांमध्ये सुधारणा होणे बाकी आहे.

प्रकल्प आढळलेली सॅम बालके सुधारणा झालेल्या बालकांची संख्या

अर्धापूर २७ २३

भोकर ३० २६

बिलोली ३२ ३०

देगलूर ३१ २९

धर्माबाद ३९ ३२

हदगाव ३७ २९

हिमायतनगर २९ २४

कंधार ५५ ४३

किनवट ५२ ३९

लोहा ३४ २७

माहूर २५ २१

मुदखेड २२ १९

मुखेड ३५ २५

नांदेड ३० २२

नायगाव ३२ २६

उमरी २३ २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.