Nanded News : घरकुलांची होणार स्वप्नपूर्ती

स्वस्तात मिळणार वाळू; जिल्ह्यात तीन डेपो लवकरच सुरू
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू अभावी लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलांची कामे तसेच अनेक बांधकामे रखडली होती. जिल्ह्यातील वाळू घाटावर शासनमान्य डेपो सुरू झाले नसल्याने अडचणी येत होत्या. अखेर त्यास मुहुर्त मिळाला असून लवकरच दोन चार दिवसात नांदेड तालुक्यातील भायेगाव, खुपसरवाडी आणि वाघी या तीन ठिकाणी वाळू डेपोची सुरूवात होणार आहे.

तसेच जिल्ह्यातील सात तालुक्यामध्येही वाळू डेपो तयार करून स्वस्त दराने वाळू विक्री करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता घरकुलांच्या लाभार्थ्यांची स्वप्नपुर्ती होणार आहे तसेच रखडलेली बांधकामेही मार्गी लागणार आहेत. जिल्ह्यात गोदावरीसह लेंडी, मांजरा, पैनगंगा व इतर नद्या आहेत. २०२१-२२ पर्यंत जिल्हा प्रशासनाला वाळू लिलावातून महसूल मिळत होता.

त्यावेळी साडेअकरा कोटीचा महसूल मिळाला होता. जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट आहेत त्यापैकी ६५ वाळू घाटांनाच पर्यावरणाची अनुमती आहे. मात्र, आता राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ता. १९ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे.

nanded
Nanded News : माळेगाव यात्रा ‘प्लास्टिकमुक्त’ करण्याचा संकल्प

नवीन वाळू धोरणानुसार नांदेड तालुक्यात भायेगाव, खुपसरवाडी व वाघी येथे वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील बिलोली, लोहा, देगलुर, माहूर, उमरी, हदगाव व हिमायतनगर या तालुक्यामध्ये लवकरच वाळू डेपो तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी स्वस्त दराने वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ऑनलाईन वाळूची विक्री होणार

या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास सहाशे रुपये अधिक इतर कर ७७ रुपये या प्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना वाळू बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजर वर https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि त्यात नाव, मोबाईल क्रमांक व स्वतःचा ई-मेल आयडी इत्यादी आवश्यक ती माहिती भरावी.

शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत घ्यावी व संबंधित डेपोवर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन तेथून वाळू घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील घरकुलाच्या लाभार्थ्यांना विनामूल्य पाच ब्रास वाळू देण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन प्रायोगिक तत्वावर लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर नागरिकांना देखील बांधकामासाठी शासन नियमानुसार वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी.

nanded
Nanded News : पतीने मारहाण करून केला पत्नीचा खून

घरकुलाला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची प्रतिक्षा होती. वाळूचा तुटवडा आणि दरही जास्त असल्यामुळे ती मिळणे देखील अवघड आणि परवडणारे नव्हते. प्रशासनाने वाळू उपलब्ध करून दिल्यामुळे आमची समस्या आता सुटण्यास मदत होईल आणि घरकुलही लवकर पूर्ण होईल.

- हणमंतराव वाघमारे, लाभार्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()